शासन निर्णय

कामकाजाचे १२ तास करण्याचे परिपत्रक रद्द करा” – भारतीय मजदूर संघाची मागणी

कामगार मंत्र्यांना शिष्टमंडळ भेटले

मुंबई, दि. १० सप्टेंबर :


महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या १२ तास कामकाजाच्या परिपत्रकाचा भारतीय मजदूर संघाने तीव्र निषेध केला आहे. आज संघाच्या महाराष्ट्र प्रदेश शिष्टमंडळाने कामगार मंत्री अँड. आकाश फुंडकर यांची भेट घेऊन परिपत्रक रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

८ तास काम व ४८ तास आठवडा हा कायद्याने संरक्षित हक्क आहे. १२ तास कामामुळे रोजगाराच्या संधी कमी होतील. महिलांचे व कुटुंबीय जीवन धोक्यात येईल. कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल.असे मुद्दे शिष्टमंडळाने यावेळी मांडले

कामगार मंत्री अँड. फुंडकर यांनी निवेदन गांभीर्याने ऐकले व सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले. तसेच महागाई भत्त्या बाबतीत सरकार ने सकारात्मक निर्णय करून कामगारांना न्याय मिळवून देण्यात यावा अशीही मागणी सचिन मेंगाळे सरचिटणीस अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ यांनी केले आहे . शासनाने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय मजदूर संघाने दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. अनिल डुमणे, महामंत्री किरण मिलगीर, संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, वीज उद्योगातील कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, कोशाध्यक्ष सागर पवार, संघटन सचिव उमेश आणेराव, मुंबई सचिव संदीप कदम, मोहन येणुरे, सुरेश पाटील तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button