इतर

जीवनात यशस्वी होण्यासाठी विस्श्वासार्ह प्रतिमा निर्माण करणे आवश्यक- सायली सप्तर्षी

नाशिक प्रतिनिधी

  आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुणवत्ता व कौशल्य अंगी असून चालत नाही तर व्यक्तिमत्व विकास, प्रभावी संवाद कौशल्य, सर्व समावेशक नेतृत्व व आत्मविश्वासाद्वारे समाजामध्ये, व्यवसायामध्ये आपले वेगळे स्थान,वेगळी ओळख,आपली सकारात्मक व विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करणे आवश्यक असते, असे  प्रतिपादन सायली सप्तर्षी यांनी केले़. रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित *पर्सनल ब्रॅण्डिंग अँड एक्झिक्युटिव्ह प्रिसेंस* या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ़़ गौरव सामनेरकर होते. 

  व्यक्तीची वर्तणूक,त्याचे संवाद कौशल्य ,देहबोली व निर्णय क्षमता यामुळे कोणत्याही व्यक्तीची  समाजामध्ये वेगळी ओळख कशी निर्माण होते हे  सायली सप्तर्षी यांनी विविध प्रात्यक्षिके व उदाहरणाद्वारे सोप्या भाषेत प्रभावीपणे सर्वांना पटवून दिले.

   वृषाली ब्राह्मणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.गौरव सामनेरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रणाली जोशी यांनी  व आभार प्रदर्शन सेक्रेटरी सीए रेखा पटवर्धन यांनी केले.

     कार्यक्रमाला मोना सामनेरकर, मकरंद चिंधडे,प्रफुल्ल बरडिया, ओमप्रकाश रावत, शिल्पा पारख,   स्मिता अपशंकर, एडव्होकेट विद्युल्लता तातेड, विनायक देवधर, राज तलरेजा, विश्वजीत दळवी, वैशाली रावत, एडव्होकेट महेंद्र एकबोटे  व रोहित देशपांडे   उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button