उपमहापौर जाधव यांचा ग्रीन सिटी उपक्रम आदर्श -रामदास फुले

अहिल्यानगर प्रतिनिधी-
अहिल्यानगर ग्रीन सिटी मोहिमेचे पुरस्कर्ते उपमहापौर धनंजय जाधव यांनी नगर शहराच्या पर्यावरण चळवळीला मोठे बळ दिले आहे.कोरोना काळापासून ऑक्सिजनची कमी जाणविल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले. “झाडे लावा झाडे जगवा”या संकल्पनेतून नगर शहराच्या विकासाला मोठी चालना उपमहापौर धनंजय जाधव यांनी दिली आहे.ग्रीन सिटी या मोहिमेमुळे नगर शहराचे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईलच तसेच नगर शहराचे नंदनवन लवकरच होईल.या ग्रीन सिटी मोहिमेसाठी सकल माळी समाज सरसावला आहे.उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून साकारणारे ग्रीन सिटी प्रोजेक्ट ठरणार आदर्श पर्यावरण प्रकल्प असे प्रतिपादन सकल माळी समाजाचे नेप्ती विभाग प्रमुख रामदास फुले यांनी केले आहे.
उपमहापौर धनंजय जाधव यांचा सकल माळी समाजाच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला . तसेच शहरात राबवणारे ग्रीन सिटी प्रोजेक्ट ला सकल माळी समाजाने पाठिंबा दिला आहे. यावेळी सकल माळी समाजाच्या वतीने विविध वृक्षाचे वाटप नागरिकांमध्ये करण्यात आले. याप्रसंगी सकल माळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नेप्ती विभाग प्रमुख रामदास फुले ,विश्वस्त विनोद पुंड, राजेंद्र पडोळे,कोरकमिटी सदस्य अनिल इवळे,अमोल भांबरकर,चंद्रकांत पुंड,कॅप्टन सुधीर पुंड,सुरेश कावळे, रमेश चिपाडे,डॉ.दामोदर कळमकर, रोहित पठारे, गणेश कोल्हे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब भुजबळ म्हणाले, उपमहापौर धनंजय जाधव यांनी अहिल्यानगर शहराला दिशा देणारा ग्रीन सिटी प्रकल्प हाती घेतला आहे.या ग्रीन सिटी प्रोजेक्ट ला शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.सध्याच्या काळात वाढते तापमान कमी होणेसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची गरज आहे. महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या ग्रीन सिटी प्रोजेक्ट या प्रकल्पास सकलमाळी समाज पाठिंबा देत आहे.शहरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठीक ठिकाणी आयोजन करण्यासाठी सकल माळी समाज पुढाकार घेईल.असे सांगितले आहे. .



