इतर

बारी (ता अकोले) ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा गैरव्यवहार चौकशी ची मागणी

दोषींनां पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – विजय पवार

अकोले प्रतिनिधी 

 ‘कळसूबाई शिखर’ पायथ्याशी असणाऱ्या  आदिवासी आणि दुर्गम भागातील बारी ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे

वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीत हा घोटाळा झाला असून, देवेंद्र काशिनाथ खाडे व स्थानिक ग्रामस्थांनी या विरोधात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत  चौकशीची मागणी केली आहे.  बारी येथील  देवेंद्र खाडे, गोरख खाडे, किसन खाडे, राधाकृष्ण खाडे व सागर खाडे यांनी या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे.

 ग्रामस्थांनी पुराव्यांसह केलेल्या दाव्यानुसार, सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांनी कोणतीही ग्रामसभा न घेताच थेट संगनमत करून बोगस कारभार केला, दुसऱ्या गावातील विकासकामांचे फोटो ऑनलाइन अपलोड करून शासकीय निधी लाटल्याचा गंभीर आरोप आहे. 

 ग्रामस्थांनी या भ्रष्टाचाराविरोधात १० मार्च २०२६ व ६ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती अकोले, आणि ४ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे तक्रारी  केल्या होत्या. मात्र, यावर तपास करणारे विस्तार अधिकारी अटकोरे व सहायक गटविकास अधिकारी मुठे यांनी थातूरमातूर चौकशी करून हे गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला आहे. 

अकोले तालुक्यातील बारी या ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याबाबत वेळोवेळी तक्रारी वरिष्ठा कडे केल्या आहे त तरी त्याची दखल घेतली जात नाही या गैर व्यवहारात दोषी असणाऱ्यां अधिकारी, पदाधिकारी,कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी तसेच दोषी नां पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी आर.पी. आय. चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे

पाणीपुरवठा योजना दुरुस्ती,सोलर पंप खरेदी, शाळा व संगणक खरेदी, जिम साहित्य, स्मशानभूमी,या  विकास का मां वर  सुमारे 14 लाखापेक्षा अधिक रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी आनंद भंडारी आणि अकोलेच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बारी ग्रामपंचायतीची बँक खाती तत्काळ ‘सील’ करावीत गावात प्रत्यक्षात पाणीच नाही, तरीही दुरुस्तीची बिले काढली. जमिनीवर अशी कोणतीही कामे झालेली नाहीत.

 दुर्गम भागातील तरुणांसाठी कागदावरच जिम उभी केली आहे  येथे ही संशयास्पद खर्च दाखवण्यात आला. दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवावे, अशी मागणी देवेंद्र खाडे यांच्यासह बारीच्या ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button