इतर

नाशिक येथे 150 दिव्यांगांना काठ्यांचे वाटप

नाशिक प्रतिनिधी


ह्युंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंग व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब ), नाशिक जिल्हा शाखा,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 150 दिव्यांगांना काठ्यांचे वाटप करण्यात आले़. हुंडाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंग यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक जिल्हा शाखा,नाशिक यांना दिलेल्या सी एस आर फंडातून सदर काठ्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम रुंग्ठा हायस्कूल नाशिक येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक मनपा शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी मा. डॉ. श्रीमती मिता चौधरी होत्या.
हुंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंगचे झोनल मॅनेजर तेजस गोलीवडेकर यांनी त्यांच्या कंपनी बद्दलची माहिती सांगितली. ‘नॅब’चे संस्थापक अध्यक्ष एडव्होकेट प्रकाशचंद्र सुराणा यांनी नॅब’ च्या कार्याची माहिती सांगितली.

रुंग्ठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका टिळे मॅडम यांनी नॅबच्या कार्याचे कौतुक केले. टॉर्चीट फाउंडेशनचे प्रशिक्षक मार्गदर्शक श्री दिनेश बहल यांनी अंधांच्या काठीचे तसेच ते वापरत असलेल्या विविध साहित्यांची तांत्रिक माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद जाधव यांनी व सूत्रसंचालन नीरजा संगमनेरकर यांनी केले. नॅबच्या अध्यक्षा एडव्होकेट विद्युल्लता तातेड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संदीप मिश्रा,कुशल सौंज, गणेश जगताप, राहुल मुळे,राजेंद्र कलाल, शाहीन शेख,चक्रधर जाधव, निरजा संगमनेरकर,निलेश जाजू, मोहनलाल लोढा व अनिल खालकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button