शहादा येथे – जनसुरक्षा विधेयक विरोधात निदर्शने

शहादा दि १० जनसुरक्षा विधेयक विरोधात आज दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी राज्यव्यापी निदर्शने -आंदोलनाबाबत बिरसा फायटर्स शहादा येथील कार्यकर्त्यांनी मा.उपविभागीय अधिकारी शहादा जि.नंदुरबार* यांना निवेदन दिले व जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून विरोध दर्शविला.

यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,लोहाराचे सुरेश पवार,दिलीप मुसळदे, नागेश जाधव,जालिंदर पावरा, अक्षय शेल्टे, कैलास पावरा, जगदीश डुडवे आकाश तडवी मुकेश पावरा, उद्या पाडवी
बिंद्या पाडवी, अनिल पाडवी विनेश पाडवी
,किसन वळवी सुंड्या पाडवी, दादी पाडवी,
कमलाबाई पाडवी, धडगांव तालुक्यातील मुकेश पावरा
,रानू वळवी,हिरा पाडवी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



