अकोल्यात विरगाव फाटा येथे अवैध दारू विरुद्ध महिलांचे रस्ता रोको आंदोलन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात वीरगाव फाटा येथे दारू विक्री च्या विरोधात आदिवासी महिलांनी अचानक रास्ता रोको केला..पोलीस प्रशासनाने पाच दिवसात दारू बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्यावरच रास्ता रोको मागे घेण्यात आला.
अकोले तालुक्यात अद्यापही अवैध दारू विक्री सुरूच असल्याने दिसून येत आहे पोलीस प्रशासनासोबत तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा चर्चा बैठका होऊन व मागणी करूनही काही केल्या अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री थांबत नाही अकोल्यातील तालुक्यातील राजुर,कोतुळ,अकोले समशेरपुर,देवगाव,विरगाव फाटा,ब्राह्मणवाडा, लिंगदेव, अशा अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्री बाबत अनेक वेळा आंदोलने झाली मात्र दारू विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याबाबत आता चर्चा सुरू आहे

अकोले तालुक्यातील विरगाव फाटा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री होत असल्याने या ठिकाणची परिसरात गुन्हेगारी वाढत आहे मद्यपींचा उपद्रव वाढत असल्याने या भागातील महिलांनी आज विरगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ पाच दिवसात दारू बंद करून असे आश्वासन देऊन आंदोलन करता महिलांचे समाधान केले आता पाच दिवसानंतर अवैध दारू बंद होते की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अवैध्य दारू विक्री सोबत अकोले तालुक्यात मटका, जुगार आणि गांजा तसेच गुटखा विक्रीचा व्यवसाय देखील तेजीत सुरू आहे याकडे देखील प्रशासन लक्ष देणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
————


