इतर

राज्यातील वीज उद्योगातील कामगार तीन दिवस संपावर

पुणे दि 6

राज्यातील वीज उद्योगातील कायम कामगारांनी दि. 9, 10 व 11 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केलेल्या तीन दिवसीय संपाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) या संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीने पाठिंबा जाहीर केला आहे.

राज्यातील सुमारे 42,000 वीज कंत्राटी कामगार विविध प्रलंबित मागण्या आणि सध्याच्या अडचणींनी त्रस्त आहेत. संघटनेने या समस्या मा. ऊर्जामंत्री, शासन व प्रशासन यांना वारंवार लेखी स्वरूपात कळवल्या असूनही अद्याप संघटनेला अधिकृत चर्चेसाठी बोलावण्यात आलेले नाही.

संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण व्हावे या उद्देशाने, राज्यातील सर्व कंत्राटी कामगार दि. 9 ऑक्टोबर रोजी काळी फित लावून निषेध व्यक्त करतील तसेच दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता “द्वारसभा” घेऊन कामबंद आंदोलनास सुरुवात करतील, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. निलेश खरात, प्रदेश सरचिटणीस व भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष मा. सचिन मेंगाळे यांनी दिली

, “वीज कंत्राटी कामगारांच्या आंदोलनास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा पाठिंबा , कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कां च्या मागण्यां बाबतीत रस्त्यावर उतरणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button