कंपनीचा सी एस आर फंड गावच्या विकासासाठी मिळावा -विजय पवार

अकोले प्रतिनिधी
डॉडसन लिंडसन हायड्रो पॉवर प्रा लि कंपनीकडून अकोले तालुक्यातील कोदणी व भंडारदरा येथील गावांच्या विकासासाठी सी एस आर चा निधी मिळावा व कंपनी त स्थानिक तरुणांना नोकरीत घेऊन कायमस्वरूपी करण्यात यावे अशी मागणी अकोले तालुका आरपीआयचे युवा अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
डॉडसन लिंडसन हायड्रो पॉवर प्रा लि या कंपनी अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोदणी व शेंडी (भंडारदरा) तालुका अकोले येथे जलविद्युत प्रकल्प गेल्या पंधरा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे
अकोले तालुक्यातील कोदणी व भंडारदरा ही गावे आदिवासी व अति दुर्गम भागातील पेसा क्षेत्रात येत आहे सदर गावातील
आहे लोक वस्ती ही शंभर टक्के आदिवासी आहे सदर गावात आपल्या कंपनीचा वीज निर्मिती प्रकल्प अनेक वर्षापासून सुरू सदर प्रकल्पातून कंपनीला दरवर्षी लाखो रुपयाचा फायदा होत आहे तरी देखील कंपनीचा प्रकल्प ज्या गावांत सुरु आहेत त्या गावच्या सामाजिक, शैक्षणिक व भौतिक विकासासाठी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही स्थानिक ग्रामपंचायती कडे स्थनिक महसूल व पर्यावरण प्रदूषण कर ही दिला जातं नाही गावाला मोफत वीज द्यावी स्थानिक तरुणांना प्राधान्याने नोकरीत घ्यावे व ज्यांना घेतले आहे त्या तरुणांना पगार वाढ करून पर्मनंट करण्यात यावे या गावकऱ्यांच्या मागणीकडे ही आपण दुर्लक्ष केले आहे
ग्रामपंचायतने वेळोवेळी मालमत्ता करायची मागणी करूनही तो दिला जात नाही याशिवाय गावच्या विकासासाठी
कंपनीच्या सीएसआर फंडाचा निधी अद्याप मिळालेला नाही
तरी कंपनीच्या या प्रकल्पातून कंपनीला मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाचा पाच टक्के हिस्सा गावचे स्थानिक विकासासाठी
सी.एस.आर फंडाच्या माध्यमातून मिळावा ही विनंती सदर निधी मिळण्यासाठी रणद बुद्रुक व कोदणी ग्रामपंचायतने ग्रामसभेचा ठराव देखील दिला आहे
तरी आपले कंपनी चा सी एस आर फंड चा पाच टक्के निधी गावच्या विकासासाठी देणेबाबत लवकरात लवकर योग्य ती
कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री विजय पवार यांनी केले आहे