इतर

….म्हणून अजित दादांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले

पुणे दि 13

राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आपले शिक्षण अर्ध्यावर का सोडले याचा खुलासा रूपालीताई चाकणकर यांनी केला आहे

आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते.वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे.

शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला.

गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच..असे त्यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button