इतरपर्यटन

सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून देवस्थानांच्या व पर्यटनस्थळे विकासासाठी संगमनेर तालुक्यात दोन वर्षांत 6 कोटींचा निधी



संगमनेर (प्रतिनिधी) मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजीत तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थानांच्या सुशोभीकरण कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत मागील दोन वर्षात सुमारे 6 कोटींचा निधी संगमनेर तालुक्यात मिळाला असल्याची माहिती शॅम्प्रोचे व्हा. चेअरमन सुभाष सांगळे यांनी दिली असून नवीन लोकप्रतिनिधी यांनी नवीन कामांसाठी नवीन निधी आणावा. जुन्याच प्रस्तावांच्या मागणीवर आलेल्या निधीची निधीचे श्रेय घेऊ नये तसेच या निधीबाबत पत्रकबाजी करून जनतेची दिशाभूल करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सुभाष सांगळे म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने प्रत्येक गावामध्ये विकासाच्या योजना राबवल्या आहेत. स्वतःच्या कामातून त्यांनी संगमनेर तालुका हा विकसित व वैभवशाली म्हणून राज्यात अग्रगण्य बनवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने विविध शासकीय विभागांमधून निधी मिळवत विकास कामांना गती दिली आहे.

संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी आमदार सत्यजित तांबे यांनी तयार केलेल्या जुन्याच प्रस्तावावर निधी मिळवण्याचे काम केले आहे. त्यांना तालुक्यासाठी निधी आणावयाचा आहे. तर तो नवीन कामांसाठी आणला पाहिजे. असा निधी आणला तर आम्ही सुद्धा अभिनंदनच करू. मात्र जुन्या प्रस्तावांच्या निधी मंजुरीचे श्रेय घेऊ नये. तसेच जुन्या प्रस्तावावर मंजूर झालेल्या निधीची पत्रक बाजीपत्रक करणे हे अत्यंत चुकीचे आहे. ज्यांनी निधी मिळवला त्यांना श्रेय दिलेच पाहिजे ही आपली संस्कृती आहे. मात्र दुसऱ्याने मिळवलेल्या निधीवर नवीन लोकप्रतिनिधी हक्क सांगू नये असे सांगताना या निधीबाबत अर्धवट माहिती घेऊन नवे लोकप्रतिनिधी व त्यांचे प्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करत आहे.

पर्यटन विभागामार्फत आमदार सत्यजित तांबे यांनी 2022 – 23 मध्ये तेरा कामांसाठी 3 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मिळवला. या अंतर्गत तळेगाव दिघे येथील बिरोबा महाराज देवस्थान साठी 20 लाख रुपये ,साकुर येथील वीरभद्र देवस्थान परिसरासाठी 50 लाख रुपये , धांदरफळ खुर्द येथील बिरोबा देवस्थान करतात 15 लाख रुपये, लोहारे येथील औजीनाथ देवस्थान परिसर सुशोभीकरण कामासाठी 50 लाख रुपये पारेगाव खुर्द येथील मारुती मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 15 लाख रुपये खांडगाव येथील कपालेश्वर देवस्थानसाठी वीस लाख रुपये वेल्हाळे येथील खंडोबा देवस्थान साठी 15 लाख रुपये,वडगाव लांडगा येथील काशीआई मंदिर परिसरासाठी 15 लाख रुपये, खळी येथील खंडोबा देवस्थानसाठी 50 लाख रुपये, पेमगिरी येथील पेमादेवी देवस्थान परिसरासाठी 20 लाख रुपये, आंबी खालसा येथील मुळेश्वर मंदिरासाठी 25 लाख रुपये, अकलापूर येथील दत्त देवस्थान परिसरासाठी 40 लाख रुपये.

2023- 24 या वर्षात 17 कामांसाठी 1 कोटी 95 लाख रुपये निधी मिळवले. या अंतर्गत पिंपरणे येथील राहिंज वस्ती बिरोबा मंदिर परिसरासाठी 10 लाख रुपये, जोरवे येथील महालक्ष्मी मंदिरासाठी 10 लाख रुपये, निमगाव जाळी येथील खंडोबा मंदिर परिसरासाठी 10 लाख रुपये, आनंदवाडी येथील कळमजाई मंदिरासाठी 10 लाख रुपये ,निमगाव जाळी येथील त्रिंबकजी डेंगळे स्मारकासाठी 10 लाख रुपये, कोकणगाव येथील निझरनेश्वर मंदिरासाठी 10 लाख रुपये, शिरपूर येथील महादेव मंदिरासाठी 10 लाख रुपये, पिंपळे येथील म्हसोबा मंदिरासाठी 10 लाख रुपये, निमगाव टेंभी येथील काशाई मंदिरासाठी 10 लाख रुपये, संगमनेर खुर्द येथील संरक्षण भिंत 10 लाख रुपये, कवठे मलकापूर खंडोबा देवस्थानसाठी 10 लाख रुपये , नान्नज दुमाला येथील खंडोबा मंदिरासाठी 15 लाख रुपये, संगमनेर बुद्रुक मारुती मंदिर माळीवाडा सभा मंडपासाठी 15 लाख रुपये , वडझरी येथील साईबाबा मंदिरासाठी 15 लाख रुपये,निमगाव जाळी तील खंडोबा मंदिरासाठी 15 लाख रुपये, चिंचपूर येथील उघडा मारुती मंदिरासाठी 15 लाख रुपये, अंभोरे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 15 लाख रुपये,धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर परिसरासाठी 20 लाख रुपये.

तर 2025 26 या वर्षांमध्ये खांडगेदरा येथील कलमजाई मंदिरासाठी 25 लाख रुपये, कोकणगाव येथील तुळजाई मंदिरासाठी 20 लाख रुपये, असे एकूण सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत मिळवला आहे.



इयत्ता 4 थी च्या नागरिक शास्त्राची पुस्तके भेट देणार

नवीन लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक यांचे राजकीय ज्ञान अत्यंत अर्धवट असून विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असते. वरिष्ठ सभागृहातील सदस्यांना नेहमी कायम वरचा दर्जा असतो. आमदार सत्यजित तांबे हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांचा प्रोटोकॉल हा कसा असतो, विधानसभा किंवा विधानपरिषद आमदारांना काय अधिकार असतात, हे राजकीय अभ्यास कमी असणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांना समजावे यासाठी इयत्ता 4 थी चे नागरिक शास्त्राचे पुस्तके भेट देणार असल्याचे सुभाष सांगळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button