रणद खुर्द ता.अकोले येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गांडूळ खत प्रशिक्षण

एस के जाधव
प्रतिनिधी /कोकणेवाडी ता अकोले
दिनांक 12ऑक्टोबर २०२५ रोजी, ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणद खुर्द येथे गांडूळखत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शाळेत 1242 फुटाचा गांधुळखत बेड तयार करण्यात आला.या प्रशिक्षणाला मुलांच्या सक्रिय सहभागामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले.
बायफचे श्री. राम कोतवाल , श्री विजय कातडे सर गांडुळखत चे महत्व सांगितले, परसबागेमधे खताचे महत्व, सेंद्रिय शेती, मुलानी अर्धवट कुजलेले शेणखत,पालापाचोळा यांनी बेड भरण्याचे काम सुरू आहे.45 दिवसात उत्तम प्रकारे गांडुळखत तयार होईल.तयार झालेले खत हे शाळेच्या परिसरात बहुवर्षायू परसबागेचे रोपे, हंगामी परसबागेत जसे मिरची वांगी वाल टोमॅटो भेंडी, आंबा, पेरु, लिंबू,शेवगा, हादगा,कडीपत्ता, अंजीर,चिकू,गवती चहा,प्रकार, जसे हंगामी परसबाग, बहुवर्षायू परसबाग तसेच कंदवर्गीय, वेलवर्गीय, मूळवर्गीय, शेंगवरगीय, पालेभाज्या, तसेच रानभाज्या तसेच शोभिवंत झाडे इ साठी खत वापरता येईल.त्यामुळे सेंद्रिय भाजीपाला शाळेत उपलब्ध होईल.शाळेत खत तयार होणार असल्यामुळे विकत घ्यावी लागणार नाही, तसेच घरी मुले आपल्या पालकांना आपल्या शेती साठी घरी असे बेड बांधून आपल्या घरी गांडुळखत बनू शकता, त्यामुळे रासायनिक खतावर होणारा अतिरिक्त खर्च कमी होईल तसेच सेंद्रिय शेती ला चालना मिळेल, शेती मालाला योग्य किंमत किंवा बाजारभाव मिळेल . गांडुळखत कसे तयार या विषयावर सविस्तरपने माहिती देऊन प्रात्यक्षिक करण्यात आले.
तसेच शाळा हे एक विकासाचे केंद्र बिंदू म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शाळेत असताना मुलांना अशा पद्धतीने डेमो, शेती चे धडे मिळाले तर भविष्यात मुले चांगली शेती करू शकतात.त्यामुळे एक चांगले उदाहरण या शाळेत बघायला मिळेल. रणद खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बघण्यास मिळते.
या कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर व श्री. अरुण बांबळे आणि बायफचे श्री. प्रदीप खोसे, श्री सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बायफ चे राम कोतवाल, विष्णु चोखंडे, निलेश आलवने, काजल देशमुख, मारुती सगभोर यांनी केले.
हा प्रकल्प राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कातडे सर, उपध्यापिका हिरा देशमुख मॅडम यांनी केले.



