आदिवासी अतिदुर्गम सातेवाडीत विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे मोफत वाटप

अकोले प्रतिनिधी
रविवार दि.२३/११/२०२५ रोजी सकाळी ११ ते १.३० दरम्यान स्व. बाबुराव सखाराम बोऱ्हाडे (बी.एस.बी.) एज्यूकेशनल संस्था उल्हासनगर-४ संचालित न्यू इंग्लिश स्कूल जांभळेवाडी (सातेवाडी) ता.अकोले, जि.अहिल्यानगर विद्यालयात श्री.नामदेव गवळी पोस्टमन, वाघोली पुणे .श्री.अमोल जगताप-सामाजिक कार्येकर्ते .श्री.दत्तात्रय मुठे-आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त, फोफसंडी यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना ५० सायकलचे वाटप करण्यात आले.
येसरठाव, खेतेवाडी, घोटकरवाडी ,मोरवाडी, गांजविहीर, खवटी, त्रिशूळवाडी, जांभळेवाडी यासारख्या डोंगर द-यातून विद्यार्थी शाळेत येतात. शाळेत येण्यास उशीर होतो. त्याचा परिणाम अभ्यासावर व गुणवत्तेवर होतो. त्यांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, मुले सहा-सात किलोमीटर वरून पायी येतात. विशेष म्हणजे या गावात एस.टी.पण येत नाही. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकल मोफत वाटप केल्याची त्या गावात जोरदार चर्चा आहे. यापूर्वीही श्री.नामदेव गवळी व श्री.दत्तात्रय मुठे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले होते.

या प्रसंगी श्री.नामदेव गवळी, श्री. अमोल जगताप व श्री. दत्तू मुठे यांनी विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर आमचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे आवाहन केले. तसेच स्व. बाबुराव सखाराम बोऱ्हाडे (बी.एस.बी.) एज्यूकेशनल संस्था उल्हासनगर-४ संस्थेचे कार्यकारी संचालक-श्री.प्रतिक बोऱ्हाडे उपस्थित होते. त्यांनी मिळालेल्या मोफत सायकलीबाबतची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवावी यापासून प्रेरणा घेऊन पुढे आपणही मोठे झाल्यावर असेच परिसरातील विद्यार्थ्यांस व विद्यालयांस सहकार्य करावे. त्यांनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले व यापुढेही शाळेस , संस्थेस सहकार्य करण्याचे अवाहन केले.

कार्यक्रमास श्री.झांजे साहेब-अॅसिस्टन्ट मॅनेजर विप्रो,मुंबई श्री.केशव बुळे –सरपंच, सातेवाडी, श्री. देशमुख बी.के.-संस्था निरीक्षक, श्री.आरोटे आर.एल.-मुख्याध्यापक, सावरकुटे, श्री.पवार ए. के.-संस्था समन्वयक, सौ.रोहिणीताई गभाले-उपसरपंच, श्री. मारुती मुठे-माजी सरपंच, लक्ष्मन मुठे, ज्ञानदेव मुठे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री.जानिकनाथ मुठे, श्री.रंगनाथ मुठे, काशिनाथ दिघे, शिवराम दिघे, मुख्याध्यापक-श्री.देशमुख एस.एम., शिक्षक-श्री.काळेसर, श्री.डाकेसर, श्रीम.खुर्पे मॅडम,श्री. अशोक साबळे, श्री.सीताराम मुठेसर, पालक, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. काळे एच.बी. व श्रीम.खुर्पे एस.ए. यांनी केले.
————




