अवैध देशी दारु विकणाऱ्यावर राजूर पोलिसांची कारवाई, 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
राजूर परिसारातील दिगंबर रोड (ता. अकोले) येथे विक्रीसाठी आणलेली अवैध देशी दारू विकणाऱ्यास राजूर पोलिसांनी छापा टाकून पकडले
अकोले( शाहूनगर)येथील राजेश बबन शिंदे हा मोटरसायकल नंबर एम. एच 17 /2578 वरून दिगंबर रोड परिसरात अवैध दारूची विक्री वाहतूक करीत आहे अशी बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी दोन वाजता छापा टाकला असता राजेश शिंदे रा .अकोले याच्याकडून 24 हजार रुपये किमतीच्या 600 देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 90 मिलि शीलबंद बाटल्या प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे तसेच
आरोपीच्या ताब्यात 65 हजार रुपये किमतीचे हिरो होंडा कंपनीची एम एस 17 /2578 अशी असा एकूण 89 हजाराचा रुपयाचा मुद्देमाल जप्त केला
असून पुढील कारवाई राजुर पोलीस स्टेशन करत आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घाग्रे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,संगमनेर पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक विलास माळवदे, सहाय्यक फौजदार मोरे, पो.कॉ सचिन शिंदे पो. कॉ. नरवडे पो. कॉ सुवर्ण शिंदे पो.कॉ सुनील रत्नपारखी, पो. कॉ. विजय काळे, पो कॉ परते यांच्या पथकाने केली आहे. राजुर पोलिसांनी पंधरा दिवसात दुसऱ्यांदा ही मोठी कारवाई केली आहे




