नगर शहरात सकल माळी समाजाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन.

अहिल्यानगर – माळीवाडा येथे थोर समाजसुधारक आणि शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास सकल माळी समाज ट्रस्टचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते त्यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक न्याय, स्त्रीशिक्षण आणि शेतकरी हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी आमदार संग्राम जगताप, सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, सकल माळी समाज ट्रस्टचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रा. माणिक विधाते सर, रोहित पठारे, माऊली मामा गायकवाड, अनिल इंवळे, रमेश चिपाडे, गणेश कोल्हे, जालिंदर बोरुडे ,प्रकाश इवळे, मच्छिंद्र बनकर ,कॅप्टन सुधीर पुंड ,ज्ञानेश्वर रासकर ,दिपक खेडकर ,नितीन डागवाले यांच्यासह सकळ माळी समाजाचे कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले यांचे कार्य महान – रामदास फुले
महात्मा फुले यांनी शोषित समाजाला शिक्षणाची प्रकाशकिरणे दिली. सत्यशोधक चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची मूलभूत दिशा होती. आजच्या तरुण पिढीने फुले यांचे विचार आत्मसात करून समाजातील अन्याय दूर करावा. समाज सुधारक महात्मा फुले यांचे कार्य महान आहे. असे प्रतिपादन सकल माळी समाज ट्रस्टचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी केले. या कार्यक्रमास सकल माळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.




