अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

अकोले प्रतिनिधी
अखिल मानवता,सामाजिक सहिष्णुता व विश्वात्मक भावनांचा प्रचार प्रसार होऊन आंतरिक समाधान मिळावे म्हणून सालाबाद प्रमाणे याही वर्षी विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोकणवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाली.
भैरवनाथाच्या कृपेने गावकऱ्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह मोठे उत्साहात पार पडत असतो. सप्ताहासाठी थोर महात्म्यांचे सुश्राव्य हरिकीर्तन, हरिपाठ, काकडा भजन, जागर होत असतो. भाविक भक्त श्रवण सुखाचा लाभ घेत असतात.
ह भ प राजेंद्र महाराज ढोन्नर यांनी काल्याच्या कीर्तनातून श्रीकृष्णाच्या लीला बरोबर समाज प्रबोधनही केले. या कार्यक्रमासाठी गायनाचार्य तानाजी महाराज गोडे, निवृत्ती महाराज गोडे, मिराबाई महाराज भांगरे काकडा भजनासाठी भीमा हरी इदे, पंढरी महाराज चौरे मृदुंगाचार्य रामदास जाधव,वाळीबा जाधव वि विणेकरी तुकाराम वाळू जाधव यांनी सेवा केली.

काल्याचे किर्तन संपल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दुपारी तीन वाजता पालखी सोहळा सुरु झाला. पालखी सोहळ्यासाठी उत्तम गोडे गोरख जाधव मीराबाई तळपाडे एकनाथ जाधव लक्ष्मण बेंडकोळी भैरव जाधव यांनी सहकार्य केले. अंबिका साऊंड सिस्टिम श्री देवराम भांगरे यांनी दिली. यावेळी सरपंच सौ सुलोचना जाधव,उपसरपंच श्री जगन लोहरे तसेच सर्व गावकरी, तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ उपस्थित होते.




