इतर

‘महादर्पण’ चे संपादक सुनील गीते रोटरी क्लब ऑफ नाशिक कडून सन्मानीत

अकोले प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या वतीने  दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार सुनील गीते यांना सन्मानित करण्यात आले सकाळचे माजी संपादक व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

दैनिक सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अभय सुपेकर, रोटरी क्लब ऑफ नाशिक चे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर , मानद सचिव रो. रेखा पटवर्धन,  प्रकल्प सचिव रो. मकरंद  चिंधडे, जनसंपर्क संचालक  एडवोकेट  रो. विद्युलता तातेड  पुरस्कार  निवड समिती अध्यक्ष डॉ. संतोष साबळे, आदींसह रोटरी क्लबचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते
पत्रकार सुनील गीते हे 1991 पासून  पत्रकारिता क्षेत्रात  कार्यरत आहेत ,दैनिक सार्वमत,  दैनिक लोकमत,  दैनिक केसरी, दैनिक प्रहार,दैनिक लोकमंथन या  दैनिकांत अनेक वर्ष ते काम करत आहेत महा दर्पण न्यूज या डिजिटल न्यू पोर्टलचे ते संपादक आहेत  पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ कामाची दखल घेत रोटरी क्लब ऑफ नाशिक ने त्यांना  दर्पन दिनी  सन्मानपत्र देऊन  गौरवण्यात आले

श्री. उत्तम कांबळे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ संपादक अभय सुपेकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अरुण मलानी, ‘ॲग्रोवन’चे बातमीदार मुकुंद पिंगळे, दैनिक भास्करचे सोमनाथ कोठुळे, छायाचित्रकार अमित शिंदे,  भ्रमरचे  हितेश शहा,  पुढारीचे आसिफ सय्यद,   लोकमत टाइम्सचे आकाश खांडके, समर्थ गावकरीचे संपादक विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र टाइम्सच्या गायत्री जेऊघाले, देशदूतचे भरत पगारे, दैनिक लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी व महादर्पण डिजिटल पोर्टलचे संपादक सुनील गीते, गावकरीचे मुकुंद बाविस्कर, दिशा न्युजचे मनोहर गायकवाड  यांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button