कृषीसहकार

जिल्हा बँक शेतीतज्ञ समिती सदस्य पदी कृषिभूषण पोखरकर यांची फेरनिवड.

 अकोले  प्रतिनिधी 

– अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन २०२५–२६ सालातील शेतकरी सभासदांना वितरित केल्या जाणाऱ्या पीक कर्ज विषयक धोरण ठरविण्यासाठी नियुक्त केलेल्या शेतीतज्ञ समितीच्या सदस्य पदी अकोले तालुक्यातील कोतुळ येथील प्रयोगशील शेतकरी आणि महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार विजेते शेतीतज्ञ सयाजीराव पोखरकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

 *अहमदनगर जिल्हा सहकारी बँक विविध पिकांचे वार्षिक कर्ज विषयक धोरण नाबार्डच्या निकषानुसार आणि सूचनांनुसार ठरवित असते.विविध पिकांबरोबरच पशुपालन,पक्षीपालन,मत्स्य व्यवसाय याकरिता खेळते भांडवल उपलब्ध करून देते संबंधित कर्जदार विषयक धोरण निश्चित करण्यासाठी या समितीची नियुक्ती केली जाते. कृषिभूषण सयाजीराव पोखरकर हे स्वतः कृषी पदवीधर असून त्यांनी यापूर्वीही या समितीचे सदस्य पद भूषविले आहे.

श्री.पोखरकर कोतुळ परिसरातील एक प्रयोगशील शेतकरी असून महाराष्ट्र सरकारने त्यांना वसंतराव नाईक शेती मित्र 2013 आणि वसंतराव नाईक कृषिभूषण 2020 या पुरस्कारांनी सन्मानित केलेले असून ऊस,आद्रक,फुलपिके व भाजीपाला पिकासोबतच त्यांचा ऊस शेतीचा विशेष अभ्यास आहे.आंतरराष्ट्रीय शेतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी इस्रायल आणि जॉर्डन या देशांचा अभ्यास दौरा ही पूर्ण केलेला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बँकेचे चेअरमन मा.आ. चंद्रशेखर भाऊ घुले पाटील, बँकेचे संचालक व अगस्ती कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर,आमदार डॉ.किरणजी लहामटे,आमदार आशुतोष काळे,संचालक मधुकरराव नवले,संचालक अमितदादा भांगरे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button