महिलाश्रम वसतिगृहाचे स्नेहसंमेलन – भरारी – होस्टेल डे -उत्साहात…

पुणे दि 29
महिलाश्रम वसतिगृहात विद्यार्थीनींच्या व्यक्तिमत्व विकाससाठी सातत्याने जे उपक्रम राबवले जातात ते अतिशय कौतुकास्पद आहेत, व त्याचा मुलींच्या विकासासाठी अतिशय चांगला उपयोग होईल असे उद्गार आकार संस्थेच्या संस्थापिका चित्रा देशपांडे यांनी काढले. महर्षी कर्वे स्त्री संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहातील मुलींचे वार्षिक होस्टेल डे भरारी 25 व 26 जानेवारी रोजी पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्या विजया पानगावे अध्यक्ष्यस्थानी होत्या.
25 रोजी मुलींसाठी स्वरगंधार ग्रुप तर्फे हिंदी -मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
संस्थेच्या माजी विद्यार्थिनी व महिलाश्रम हायस्कूल उप प्राचार्य सुचिता पवार, वसतिगृह प्रमुख सुमन तांबे/यादव यावेळी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृह प्रमुख सुमन तांबे-यादव यांनी केले.
कार्यक्रमात यावर्षी वसतिगृहातील विविध उपक्रमास मदत करणाऱ्या तसेच आजारी मुलींना आरोग्य सेवा देणाऱ्या विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन विशेष कौतुक करण्यात आले.
बालगृहाच्या सिनियर केसवर्कर श्रीम. कुमुदिनी पाठक यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला.
संस्थेसाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या हितचिंतकांचा ही सत्कार या निमित्ताने करण्यात आला. वसतिगृहाच्या उपप्रमुख पूनम पोटफोडे यांनी मुलींसाठी मदत करणाऱ्या या हितचिंतक व स्वयंसेवकांबाबत माहिती दिली.

वसतिगृहात उत्कृष्ठ काम करणाऱ्या सेविकांना वत्सल स्मृती पुरस्कार वितरणाचे काम वृषाली शिरवाळे व विद्यार्थीनींच्या बक्षीसांचे वितरणाचे काम कांचन फाळके यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थीनी पद्मजा ताकवले व ऋतुजा बोराडे यांनी केले.
पूनम पोटफोडे यांनी पाहुण्यांचे आभार मानले. आश्रम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



