जादुगार हांडे सोशल फौंडेशन ने अकोल्यात साजरा केला प्रजासत्ताक दिन.

अकोले प्रतिनिधी
जादुगार हांडे सोशल फौंडेशन च्या वतीने शिवाजीनगर, अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित प्रजासत्ताक दिन ऊत्साहात साजरा केला
टोयो कंपनीचे मॅनेजर मा.अजिंक्य नवले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.संस्था अध्यक्ष जादुगार हांडे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी मंदाकिनी हांडे,ए.बी.देशमुख. एस.टी.चासकर,मनोहर तळेकर, चंद्रभागा आरोटे यांनी कविता सादर केल्या.

प्रश्न मंजूषा कार्यक्रमात सहभागींना बक्षीस देण्यात आले. मा.नगरसेवक प्रमोद मंडलीक, ,विकास आरोटे ,वकिल प्रियांका हांडे -नवले ,लोखंडे तात्या यांनी मार्गदर्शन केले.
सदर सोहळ्यास जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलीक मा.सोमनाथ नवले,शांताराम जाधव, काळे सर,मारूती शेंगाळ ,ए.बी आढाव सर,नितीन बराते टेलर,सरिता धुमाळ इ.मान्यवर उपस्थित होते.



