इतर

नेप्ती विद्यालयातआनंदी बाजारचे भव्य आयोजन, ग्रामस्थांचा प्रतिसाद,


अहिल्यानगर: प्रतिनिधी

– नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री.स्वामी अण्णा हजारे शिक्षण संस्थेचे नेप्ती विद्यालय नेप्ती या विद्यालयात भारत स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत ‘आनंदी बाजार’ या उपक्रमाचे भव्य व उत्साहात आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या या आनंदी बाजाराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण करणे, स्वावलंबनाची शिकवण देणे तसेच व्यवहारज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती रामदास फुले यांनी दिली

. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल उभारून खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला.
या आनंदी बाजाराचे उद्घाटन माजी सरपंच दिलीपराव होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद, रामदास फुले, पाराजी चौरे,प्रा.एकनाथ होले लहू फुले, मुख्याध्यापक महेश जाधव ,नानासाहेब घोडके, राजेंद्र झावरे, बाबासाहेब भोर, गोरक्ष कोतकर, संतोष खरमाळे, शिवाजी जाधव, बाबूलाल सय्यद, राधा वामन, सविता कोरडे, श्रद्धा भांड, शिक्षक, सेवकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उपक्रमात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, सजावटीचे साहित्य, खेळणी, कागदी साहित्य अशा विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल लावले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी स्वतः किंमत ठरवून ग्राहकांशी संवाद साधत व्यवहार केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पैशाचे महत्त्व, नियोजन, ग्राहकसेवा व संघभावना यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
“आनंदी बाजारसारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक शिक्षण मिळावे, यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत.स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण व समाजभान निर्माण होते.
या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंद, स्काऊट गाईड स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आनंदी बाजारामुळे संपूर्ण विद्यालय परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button