राजूर परिसरातील सावरकुटे, कातळापूर शिवा रातील अस्वले डोंगराला आग!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजुर परिसरात असणाऱ्या केळुंगण, सावरकुटे,कातळापूर गावांच्या सरहद्दी वर असणाऱ्या अस्वले डोंगराला काल रात्री मोठी आग लागली
या आगीत शेकडो एकर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडले. रात्री आग लागल्याची समजतात राजुर वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच बाळा जाधव,पर्यावरण प्रेमी राहुल राऊत तसेच स्थनिक ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला सहा ते सात तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र या आगीत अस्वले डोंगर परिसरातील वनविभागाची काही आणि खाजगी मालकीचे क्षेत्राला आगीचा फटका बसला
या डोंगरावरील वन क्षेत्र हे अतिशय चढउताराचे कड्या कपारीचे असल्याने फारसे वृक्षारोपण नसले तरी जनावरांच्या चाऱ्यासाठी असणाऱ्या गवत चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली तसेच सरपटणाऱ्या व वन्य प्राणी, पशु पक्षांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे समजते
महाशिवरात्रीच्या पर्वावर डोंगरांना अशा प्रकारच्या आगी लागण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात
रविवारी महाशिवरात्र असल्याने महाशिवरात्रीच्या निमित्ताने अकोले तालुक्यात ठिकठिकाणी असणाऱ्या शिवतीर्थांवर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते या गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक विघ्नसंतोषी जंगलांना आगी लावतात असे प्रकार थांबावे जंगलाचे संवर्धन करावे आगीच्या दुर्घटना टाळाव्यात यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे असे आव्हान राजूर वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे



