इतर

ज्या गावात घडलो त्या गावाला मी कधीही विसरू शकणार नाही.- प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड

रुंभोडी प्रतिनिधी

ज्या भूमीत बालपण गेले, आई-वडिलांचे संस्कार झाले, आई-वडिलांच्या सोबत राहिलो, आई-वडिलांबरोबर कष्टचे कामे केले त्या कामाची जाणीव ठेवूनच शिक्षणाचे ध्येय सातत्याने ठेवले, शालेय जीवनात गावातील अनेकांनी मदत केली परंतु मालुंजकर परिवारातील तुकाराम बाबा मालुंजकर व सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण निवृत्ती मालुंजकर यांनी केलेले सहकार्य व दिलेले बळ मार्गदर्शन मी कधी विसरू शकणार नाही.

मी ज्या गावात व माय भूमी घडलो व माझ्यावर जे संस्कार झाले त्या गावाला मी कधीही विसरू शकणार नाही. असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांनी व्यक्त केले.

त्यांना सावित्री फुले विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात आलेला आदर्श प्राचार्य पुरस्काराचे औचित्य साधून शिवजयंती निमित्त रूंभोडी गावाच्या वतीने झालेल्या सत्काराच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे संचालक श्री दादा पाटील सावंत हे होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, सौ सायली अरुण गायकवाड, मातोश्री सुमनताई गायकवाड सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण मालुंजकर सर, प्रा. डाॅ. रवींद्र गायकवाड, सरपंच रवींद्र मालुंजकर, पोलीस पाटील गोरक्ष शिंदे, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सेक्रेटरी रोहिणी नवले, शांताराम मालुंजकर, प्राचार्य अंतूराम सावंत, मधुकर सावंत, प्रा. राहुल पंचम, ज्योती मुनंतोडे, काशिनाथ गायकवाड,शहाजी मुनंतोडे सर, अतुल लोहटे, किशोर काळे, बाळासाहेब मालुंजकर, प्राचार्य सुनील मालुंजकर, आधी उपस्थित होते.


सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. प्राचार्य अरूण गायकवाड म्हणाले की, आत्तापर्यंत 25 पुरस्कार मला मिळाले आहे. मात्र गावचा हा पुरस्कार सर्व पुरस्कारांपेक्षा सर्वात मोठा पुरस्कार आहे . गावाने मायभूमी केलेल्या सत्कार फार मोठा आहे. या सत्काराने मी भारावून गेलो आहे. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व कार्यक्रमांचे त्यांनी अत्यंत मनःपूर्वक कौतुक केले. ग्रामीण भागात अत्यंत दर्जेदार शिक्षणाची संधी मालुंजकर परिवाराने उपलब्ध करून दिली त्यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी लक्ष्मण मालुंजकर, पाटील बुवा सावंत, प्रा. डाॅ. रवींद्र गायकवाड यांनी कौतुकास्पद मनोगते व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच रवींद्र मालुंजकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राचार्य सुनील मालुंजकर तर आभार सेवा संस्थेचे उपाध्यक्ष अतुल लोहटे यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button