इतर

रायगड लोकसभा मतदार संघाचे मा.खासदार रामशेठ ठाकूर यांचे परिवाराकडून कोतुळ शाळेला 25 लाखाची देणगी!

कोतुळ प्रतिनिधी


रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोतुळ, (ता. अकोले, जि.अहिल्यानगर) शाखेस शाळा इमारत बांधकामासाठी रायगड लोकसभा मतदार संघाचे मा.खासदार रामशेठ ठाकूर यांच्या पत्नी सौ शकुंतला ठाकूर यांच्या कडून कोतुळ शाळेला २५ लाख रुपये ची भरीव देणगी दिली या बददल त्यांचा शाळेचे वतीने सत्कार करण्यात आला

लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर यांच्या परिवारास विद्यालयातर्फे सन्मानपत्र प्रदान केले. व राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत विद्यालयातर्फे बेल वृक्ष व तुळशीचे वृक्ष त्यांना भेट देण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री देशमुख बी. के.,पर्यवेक्षक श्री. गोडे जे. बी ,उपक्रमशील कलाशिक्षक श्री. उकिरडे एस. बी. श्री. गोरडे एस. पी , श्री. लांडे एस. बी., श्री. लांघी एस. व्ही. उपस्थितीत होते.

संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक शाळा व्यवस्थापन कमिटी, सल्लागार समिती, माजी विद्यार्थी संघ चे पदाधिकाऱ्यांनी रामसिंग ठाकूर यांचें आभार व्यक्त केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button