इतर

नेप्तीत रमजान ईद उत्साहात साजरी, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दर्शन,

रमजान ईदमुळे समाजात बंधुभाव वाढतो – माजी उपसरपंच फारूक सय्यद

अहिल्यानगर (प्रतिनिधी) –

नगर तालुक्यातील नेप्ती येथे मुस्लिम समाजाची रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले. या कार्यक्रमात हिंदू समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सकाळी शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. मौलाना मुनीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करून देशात शांतता, सुख-समृद्धी व धार्मिक सलोखा टिकून राहावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
संध्याकाळी आयोजित ईद मिलन कार्यक्रमात गावातील वाड्या-वस्तीवरील सर्व समाजातील नागरिक एकत्र आली होती. यावेळी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत होते . यावेळी सर्वांनी पारंपरिक शीरखुर्माचा आस्वाद घेत एकमेकांप्रती प्रेम व आपुलकी व्यक्त केली.


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी उपसरपंच फारुख सय्यद ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, माजी पं. स. सदस्य देवा होले , सरपंच संजय अशोक जपकर, रामदास फुले, माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर , दादू चौगुले, जालिंदर शिंदे ,चेअरमन सुरेंद्र होळकर , बाबूलाल सय्यद, मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंतराव पवार, प्रा. एकनाथ होले, मौलाना मुनीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य बंडू जपकर, बाबासाहेब होळकर ,उमर सय्यद, सुरेश कदम, जावेद सय्यद ,रमीज सय्यद वाजीद सय्यद, व्हा. चेअरमन सादिक पवार, गुलाब सय्यद, बबन सय्यद, जमीर सय्यद, मेहबूब सय्यद, सादिक सय्यद ,मुक्तार सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, सलीम सय्यद, युनूस सय्यद, हन्सार सय्यद, कयूम सय्यद, उमर सय्यद, नावेद सय्यद, आदिल सय्यद, परवेज सय्यद, बादशाह सय्यद, रफिक सय्यद, एजाज सय्यद, इम्रान सय्यद ,हुसेन सय्यद ,इरशाद शेख, अशोक जपकर, अंबादास जपकर ,दादाभाऊ होळकर ,मच्छिंद्र जपकर ,भास्कर जपकर , अतुल जपकर, पोलीस पाटील अरुण होले, अजर सय्यद, दानिश सय्यद आदींसह नाले हैदर यंग पार्टी, दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


“रमजान ईद हा आनंद, संयम आणि आपुलकीचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने समाजात परस्पर स्नेह आणि बंधुभाव अधिक दृढ होतो. नेप्ती गावात सर्व समाज एकत्र येऊन सण साजरे करतात, ही आपली परंपरा आहे. अशा कार्यक्रमांमुळे आपले आपसातील नाते अधिक घट्ट होत असून, समाजात सौहार्द आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. रमजान ईद सण हा समाजात व गावात बंधुभाव वाढवतो असे प्रतिपादन माजी उपसरपंच फारुख सय्यद यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाले हैदर यंग पार्टी व दोस्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button