इतर

सोलापूरला पद्म- बिझनेस वुमन अवॉर्ड व पद्म जलपरी पुरस्कार सोहळा संपन्न.!

.

सोलापूर : येथील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पद्मशाली समाजातील कर्तृत्ववान व कर्तबगार असलेल्या महिलांना ‘पद्म – बिझनेस वुमन अवॉर्ड व पद्म – जलपरी पुरस्कार’ सोहळा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थाटात संपन्न झाले.

प्रारंभी पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन करुन, कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, श्री मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम, वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी, शिंदे शाळेचे माजी मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली, वाचनालयाचे देवीदास गोटीपामूल, अरविंद चिन्नी, फाउंडेशनचे सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, वैकुंठम् जडल यांच्यासह आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व केलेल्या ह्रतिका श्रीराम व वयाच्या ३४ वर्षीही जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणा-या श्रध्दा यलगम यांना ‘पद्म – जलपरी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आले. तसेच कंपनी सचिव म्हणून परिचित असलेल्या आरती बेत, स्वतःच्या ब्रँड स्वतःच निर्माण करणा-या दिव्या पेंटा, स्वतःचे कौशल्य वापरुन गारमेंट व्यवसाय करणा-या सुजाता बेनगिरी, सामाजिक तळमळ व काहीतरी वेगळापणा जपणा-या कला चन्नापट्टण, जिद्द व चिकाटीने वर्षाकाठी ४० लाखापर्यंत व्यवसाय करत, बेसिन नॅपकीन तयार करणा-या कस्तुरी भंडारी, सबंध भारतात नॅपकीन बुके पुरवठा करणा-या लता म्याकल, संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवा-या भाग्यश्री पुंजाल आणि वास्तूक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ऑर्किटेक्चर श्रावणी जिंदम (मद्दा) यांना ‘पद्म – बिझनेस वुमन अवॉर्ड’ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आले आहे. सन्मान पत्र, शाल व नॅपकीन बुके असे पुरस्काराचे स्वरुप होते. उद्योजक श्रीधर सुरा यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आले. फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आले आहे. यावेळी डॉ. माणिक गुर्रम, ॲड. श्रीनिवास क्यातम, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल यांनी मनोगत व्यक्त केले.

फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी प्रास्ताविक केले. कवयित्री रेणुका बुधारम यांनी सूत्रसंचालन करत पाहुण्यांचे स्वागत केल्या. सखी संघमच्या ममता तलकोकूल यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. आभार प्रदर्शन माजी अध्यक्षा मेघा इट्टम यांनी केल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली, सखी संघम’च्या रुचिरा मासम, सविता येदूर, ममता मुदगुंडी, पल्लवी संगा, वनिता सुरम, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, भाग्यलक्ष्मी तुम्मा सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सरिता वडनाल, पार्वतय्या श्रीराम, कांचना श्रीराम, पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक आणि समाजातील प्रतिष्ठित बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button