इतर

प्रांजल नाईकनवरे ची नवोदय विद्यालयासाठी निवड..!


अकोले प्रतिनिधी

: नवोदय विद्यालय समिती यांचे मार्फत दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत जि.प.प्रा.शाळा औरंगपुर, ता. अकोले येथील विद्यार्थीनी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर येथील वरिष्ठ लिपिक श्री. अभिमान नाईकनवरे यांची कन्या कु. प्रांजल अभिमान नाईकनवरे हिची 97.50 टक्के गुण मिळवून जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे निवड झाली आहे.
तिला श्री. जाधव सर व श्री. गायकर सर यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button