ग्रामीण

आदिवासी भागात BSNLमोबाईल नेटवर्क नॉट रिचेबल.

मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाचा दिला इशारा.


अकोले प्रतिनिधी🚩
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या सातेवाडी गटात गेली अनेक दिवसांपासून नेटवर्क नसल्यामुळे मोबाईल फोन नॉट रिचेबल झाले आहेत.नेटवर्कचा चांगलाच भोजवारा उडाला आहे. त्यामुळे येथील सावरकुटे ग्रामस्थांनी बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानात सुधारणा झाली आहे.तालुक्यातील खेडोपाडयात जिवनावश्यक सुविधांबरोबरच पायाभूत सुविधा पोहचल्या आहेत.तंत्रज्ञानामुळे जग अगदी जवळ आले आहे.शेतकरी वर्गा पासून ते नौकरदारा पर्यंत प्रत्येक क्षेत्र हे इंटरनेटशी जोडले गेले आहे.प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले.जणू काही मोबाईल ही जिवनावश्यक गरज बनली आहे.परंतू या सुविधे पासून आजही सातेवाडी गटातील काही गावे वंचीत आहेत.सावरकुटे,माणिक ओझर,बलठण,बांगरवाडी, धामणवन या गावात नेहमीच नेटवर्कचा लपंडाव पहायला मिळतो.यामुळे शेतकरी, व्यापारी, शालेय विद्यार्थी, सरकारी कर्मचारी यांना नाहाक मनस्ताप सहन करावा लागतो.विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांची वेळेवर माहिती मिळत नाही.पिक विमा भरणे, ई पिक पेरा करणे, केवायसी करणे,आरोग्याच्या समस्या यांसारख्या अनेक अडीअडचणींना येथील ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.यांसारख्या अनेक व्याथा येथील ग्रामस्थांनी मांडल्या आहेत.तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांना देखील अनेक शासकीय कामे ऑनलाईन करणे शक्य होत नाही.पर्यायाने येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासाठी येथील बीएसएनएल नेटवर्क कोणत्याही अडथळयांशिवाय सुस्थितीत चालले पाहीजे.
यासाठी कांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य के.ए.ग्रुप अकोले तालुका अध्यक्ष अरुण गोंदके, सावरकुटेचे अध्यक्ष ललीत हिले, राजूरचे अध्यक्ष विनायक पारधी,ओंकार पारधी, प्रथम बांडे,प्रवीण भांगरे,अनिकेत तपासे, अनमोल भांगरे,ऋषिकेश सुपे,मयूर हिले,ऋषिकेश दिघे, पत्रकार तुषार साबळे तसेच संघटनेचे पदाधिकारी यांसह सावरकुटे के.ए. ग्रुप तसेच ग्रामस्थांच्या वतीने टॉवरवर चढून तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा देण्यात आला आहे.

यामध्ये सुधारणा झाली नाही तर टॉवरवर चढून व बीएसएनएल कार्यालयासमोर बेमुदत धरणे अंदोलन करण्याचा के.ए.ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button