आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२०/०४/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ३० शके १९४८
दिनांक :- २०/०४/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर वंसतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०७:२८, चतुर्थी २८:१५,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति २६:०८,
योग :- सौभाग्य समाप्ति १६:११,
करण :- वणिज समाप्ति १७:५०,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मेष – अश्विनी,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:४५ ते ०९:१९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१० ते ०७:४५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:५४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:१२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१२ ते ०६:४६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, तिसरी तीज, वृषभायन ०७:०८, सौर ग्रीष्मऋतू प्रारंभ, भद्रा १७:५० नं, २८:१५ प., अमृत २६:०८ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ३० शके १९४८
दिनांक = २०/०४/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)
मेष
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात तुमचा दबदबा वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल.
वृषभ
करमणुकीत जास्त वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरूनकौतुक कराल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवक जावक यांचा मेळ घालाल.
मिथुन
क्षणिक सुखाने खुश व्हाल. कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
कर्क
आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल.
सिंह
मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.
कन्या
मुलांचे विचार दुराग्रही वाटू शकतात. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.
तूळ
अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. घाई-घाईने कामे उरकू नका. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
वृश्चिक
पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.
धनू
अनाठायी खर्च वाढू शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.
मकर
श्रम व दगदग वाढू शकते. पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.
कुंभ
कामाचे समाधान लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल. सहकार्यांची योग्य वेळी मदत होईल. आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.
मीन
स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. मुलांबरोबर खेळात रमून जाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



