आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१५/०५/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २५ शके १९४८
दिनांक :- १५/०५/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५७,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५४,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति ०८:३२, चतुर्दशी २९:१२,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति २०:१५,
योग :- आयुष्मान समाप्ति १४:२१,
करण :- विष्टि समाप्ति १८:५५,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- मेष(०६:२१नं. वृषभ) – कृत्तिका,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- रवि – वृषभ ०६:२१,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:४९ ते १२:२६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:३४ ते ०९:११ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:११ ते १०:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शिवरात्रि, रवि वृषभ ०६:२१, मु. ३० साम्यार्घ, पुण्यकाल ०६:२१ ते १२:४५, अगस्ति लोप, भद्रा ०८:३२ नं. १८:५५ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २५ शके १९४८
दिनांक = १५/०५/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका. भावंडांची मदत घेता येईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारून यावा. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
वृषभ
तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
मिथुन
आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.
कर्क
मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.
सिंह
नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.
कन्या
दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
तूळ
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
वृश्चिक
आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.
धनू
तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.
मकर
प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा.
कुंभ
मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.
मीन
घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

