इतर

जिल्हा परिषद सदस्य रमेश शेंगाळ यांचे निधन

अकोले प्रतिनिधी

अहिल्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बोरी-कोतुळ परिसराचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गंगाराम शेंगाळ यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोतुळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून काम कर ताना त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण विकासाच्या कार्यात मोलाचे योगदान दिले होते. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत धडपड करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करताना ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि शेतीसंबंधित प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अचानक जाण्याने धक्का बसला

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे बोरी-कोतुळ परिसरावर शोककळा पसरली असून, एक कर्तृत्ववान व लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button