महादेव कोळी मित्र मंडळ मुंबई यांच्याकडून औंढेवाडी येथे शालेय साहित्याचे वाटप.

अकोले प्रतिनिधी
महादेव कोळी मित्र मंडळ BMC मुंबई तसेच त्यांचा सर्व परिवार यांच्या सौजन्याने सामाजिक बांधिलकीतून एक पाऊल शिक्षणाकडे या उपक्रमातून अतिदुर्गम भाग असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढेवाडी येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.महादेव कोळी मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ कुंदे यांच्या हस्ते राघोजी भांगरे,बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.वह्या,पाणी बॉटल,कंपास बॉक्स,पेन पेन्सिल अशा सर्व प्रकारच्या साहित्याचे वर्षभर वापरता येईल असे सर्व प्रकारच्या स्टेशनरी साहित्याचे वाटप करण्यात आले.तब्बल ११ हजार हजाराच्या दरम्यान वस्तू रूपाने देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नामदेव कुंदे यांची निवड करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला सर्व पालक,ग्रामस्थ,जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थी महिला वर्ग उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी महादेव कोळी मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ कुंदे यांनी एक हात मदतीचा आपल्या आदिवासी मुलांना एक चांगली प्रेरणा मिळेल मुले घडतील समाज पुढे जाईल तसेच पुणे, अहिल्यानगर,नाशिक,नंदुरबार सह्याद्रीच्या पर्वतरांग ते सातपुडा अशा जिल्ह्यांमध्ये माझे आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत.असे बोलताना सांगितले.यावेळी गावातून सर्व पालकांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित महादेव कोळी मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ कुंदे,शाळेचे शिक्षक मदन सोनवणे,सह शिक्षक विष्णू राठोड,शिवाजी गोडे,जिजाभाऊ भारमल,धोंडीबा सोनवणे,बाळू शेळके, नामदेव कुंदे,सरपंच संतोष कुंदे,जनार्दन कुंदे, काशिनाथ कुंदे,रामभाऊ कुंदे,वनिता कुंदे,गावातील सर्व महिला वर्ग तरुण मित्र मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रचंचालन शाळेचे मुख्याध्यापक मदन सोनवणे यांनी केले.तर शेवटी नामदेव कुंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आभार मानले.
n


