नाशिक रोटरी क्लब आयोजित परसबाग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने उदोजी शैक्षणिक संग्रहालय परिसर, गंगापूर रोड, नाशिक येथे ‘परसबाग लागवड व गच्चीवरील बाग’ या विषयावर दोन तासांची मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला ६० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीला
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुरेखा राजपूत, संचालक – पर्यावरण यांनी आपल्या प्रास्ताविकात करताना रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. तसेच आजच्या कार्यशाळेचा उद्देश व त्याचे महत्त्व स्पष्ट केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख यांनी रोटरीच्या माध्यमातून शेतकरी, ग्रामीण युवक तसेच ग्राहकांना निरोगी जीवनशैलीशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.
शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण करणारे ‘शेतकरी भाजीपाला मार्केट’ गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेत हेमराज राजपूत, विषय विशेषज्ञ – उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी परसबाग व गच्चीवरील बागेची आखणी, कुंड्या व ट्रेची तयारी, माती व खत व्यवस्थापन, भाजीपाला व फुलझाडांची लागवड, पाणी व्यवस्थापन तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांना प्रत्यक्ष बागकामासाठी उपयुक्त तंत्रज्ञान व पद्धती समजावून सांगण्यात आल्या.
रफिक वोहरा यांनी कंपोस्टिंग व जैविक कचऱ्याचे विघटन याविषयी मार्गदर्शन करून घरातील जैविक कचऱ्याचा योग्य पद्धतीने वापर करून सेंद्रिय खत निर्मिती करण्याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोग्राम कमिटी अध्यक्ष सोनाली चिंथडे, क्लब ॲडमिन डॉ. नेहा विधाते, मंथ डायरेक्टर पवन जोशी, मंथ लीडर सोनल कोटकर, डॉ विश्वजीत दळवी, लीना बाकरे, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रोहित देशपांडे तसेच श्री. सुधीर वाघ यांनी विशेष योगदान देत कार्यशाळेचे यशस्वी व्यवस्थापन केले.
कार्यशाळेस माजी अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, ओमप्रकाश रावत, मंगेश अपशंकर, गौरव सामनेरकर, उर्मी दिनानी, पल्लवी कुलकर्णी, दीपक कोटकर, इनक्लेव्ह चेअर संजय कलंत्री यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे स्मिता अपशंकर यांनी केले, तर रोटे ऋषिकेश सनमानवार, सेक्रेटरी, रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी आभार मानले.
कार्यशाळेत सहभागी नागरिकांना परसबाग व गच्चीवरील बागेसाठी आवश्यक रोपे, खते तसेच बागकामाशी संबंधित मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. घराघरांत परसबाग आणि गच्चीवर हिरवाई निर्माण करून निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



