पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा मार्गदर्शन व एस टी पास नोंदणी मेळावा संपन्न

भारतीय मजदूर संघा चा पुढाकार
पुणे, प्रतिनिधी
भारतीय दूरसंचार पेन्शनर्स संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ)वतीने ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) कडून मिळणाऱ्या प्रवास सवलतीच्या कार्डाबाबत जनजागृती, मार्गदर्शन व नोंदणीसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात भारतीय मजदूर संघ कार्यालय 185 शनिवार पेठ विश्वकर्मा भवन पुणे येथे करण्यात आले. या मेळाव्यास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. सवलत कार्डासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरण्याची प्रक्रिया, पात्रता, कार्ड मिळविण्याची कार्यपद्धती तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सविस्तरपणे देण्यात आली. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.

भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी यांनी सांगितले की, समाजातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी भारतीय मजदूर संघ सातत्याने जनजागृती व सेवा उपक्रम राबवत असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपा त आयोजित करण्यात येतील.या कार्यक्रम यशस्वी करण्या करिता भारतीय दूरसंचार पेन्शनर्स संघ (भारतीय मजदूर संघ) चे पदाधिकारी सौ.शोभा हर्डीकर , श्री किरण राजहंस सौ.पुष्पा महाशब्दे , सौ.वंदना कामठे ,
श्री.मुरलीधर देशपांडे ,सौ.तारका शाळिग्राम ,श्री. प्रसाद भावे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले .

मेळाव्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत भारतीय मजदूर संघाचे आभार मानले. अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबिरे नियमितपणे आयोजित करावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


