आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१४/१०/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन २२ शके १९४८
दिनांक :- १४/१०/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२४,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति २५:१४,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति २८:०३,
योग :- आयुष्मान समाप्ति २०:३९,
करण :- वणिज समाप्ति १२:१७,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. १३प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१५ ते ०१:४३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२४ ते ०७:५२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५२ ते ०९:१९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:३९ ते ०६:०६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, भद्रा १२:१७ नं. २५:१४ प., अमृत २८:०३ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २२ शके १९४८
दिनांक = १४/१०/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
करिअरमध्ये प्रगतीचे योग असून जुन्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, पण आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ
कुटुंबातील व्यक्तींसोबत काही मुद्द्यांवर वाद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. व्यवहारात संयम ठेवा.
मिथुन
तुमच्या कामाचे आणि कलागुणांचे कौतुक होईल. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष ओळख मिळू शकते.
कर्क
करिअरमध्ये मोठा आर्थिक लाभ आणि व्यापारिक जॅकपॉट मिळण्याचे योग आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रयत्नांना यश मिळेल.
सिंह
सहकाऱ्यांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. बॉसच्या सहकार्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल, मात्र घाईगडबड टाळा.
कन्या
हा दिवस आपल्यासाठी ‘गोल्डन डे’ ठरू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल.
तूळ
तुळ राशीत बुध आणि शुक्रची युती असल्याने लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन प्रोजेक्ट मिळतील.
वृश्चिक
चंद्र याच राशीत असल्याने नीचभंग राजयोग जुळून आला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ आणि करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील.
धनु
नवीन संधींचा पुरेपूर लाभ घेणे उत्तम ठरेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मकर
सुनहरे संधी मिळतील आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा.
कुंभ
कुटुंब आणि आर्थिक बाबतीत घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. अतिश्रम टाळा.
मीन
व्यवसायातील घेतलेली जोखीम फायदेशीर ठरेल. कुटुंबात तुमच्या सल्ल्याला महत्त्व मिळून आत्मविश्वास वाढेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



