इतर

सोलापुरात नवरात्रोत्सवात ‘ब्रतुकम्मा संबरालू सोहळा’

.
गोविंदराज गणेशोत्सव मंडळ व
‘पद्मशाली सखी संघम’ चा पुढाकार

सोलापूर प्रतिनिधी : नवरात्रोत्सवात अष्टमीच्या रोजी ‘ब्रतुकम्मा सोहळा’ तेलुगू भाषिक महिला, युवती आणि मुली मोठ्या उत्साहात व आनंदोत्सवात साजरा करण्याची परंपरा व संस्कृती अनेक वर्षांपासून सोलापूरात जोपासली आहे. याच अनुषंगाने श्री गोविंदराज गणेशोत्सव मंडळ आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्रतुकम्मा संबरालू’ सोमवारी १९ ऑक्टोंबर रोजी ‘ब्रतुकम्मा संबरालू’ सोहळ्याचे
संध्याकाळी ७ वाजता जुना विडी घरकुल येथे आयोजन केल्याची माहिती गोविंदराज मंडळाचे अध्यक्ष जगपती मिठ्ठा व पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा कला चन्नापट्टण यांनी दिले आहे.


हैदराबाद रोड वरील, जुना विडी घरकुल येथील ‘प्रगती चौकात’ ‘ब्रतुकम्मा संबरालू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सर्वोत्तम ‘लोकनृत्य’ करणा-या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ म्हणून एकूण ५ जणींना ‘चाटला पैठणी सेंटर’ तर्फे अनुक्रमे ‘सेमी पैठणी’ व उत्तेजनार्थ साठी ‘आकर्षक साड्या’ बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर‌ ‘ब्रतुकम्मा संबरालू’ सोहळ्यात सहभागी झालेल्यांना डॉ. गीता श्रीनिवास पिंडीपोल यांच्या ‘देवइको हब’ हर्बल शॉप तर्फे ‘अभ्यंग पावडर’, ‘अभ्यंग मीठ’, ‘जटामानसी तेल’, ‘सप्तचक्र ट्री’ अशाप्रकारे चार वस्तू एकत्र पॅक करुन ‘११ जणींना’ ‘लकी ड्रॉ’ च्या माध्यमातून दिले जाईल. ‘सुधाश्री ज्वेलर्स’च्या श्रीनिवास कट्टा यांच्याकडून ‘११ पंचधातू अंगठ्या’, ‘प्रीविंग्स फॉर यू’च्या सिद्धेश्वर व वनिता पुंजाल यांच्या तर्फे ‘११ सॅनिटरी नॅपकीन’ (पॅड) बॉक्स तर ‘आदिनाथ ॲग्रो प्रा.लिमिटेड’चे विक्री अधिकारी रवि फलमारी यांच्या कडून ‘सुरभि हॉट ॲन्ड स्वीट केचप’ अर्धा किलोच्या ‘११ पॉकीट’ बक्षीस म्हणून दिले जाईल.


‘ब्रतुकम्मा संबरालू’ सोहळ्यात महिला, गृहिणी व युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होउन बक्षीस जिकावेत, असे आवाहन पद्मशाली सखी संघम’च्या मेघा इट्टम, पल्लवी संगा, आरती आडम, ममता तलकोकूल, वनिता सुरम, वंशिका जक्का, कल्पना कट्टा, गीता भूदत्त, हेमा मैलारी, कविता साखरे, अंबिका म्याकल, रोहिणी संगा, प्रिती बोगा, वर्षा चिप्पा, लता कुंदारम, सुनिता वग्गा, सुनिता दारा, सुरेखा आडम, सोनाली तुम्मा, लावण्या मदनाल, पद्मा मेडपल्ली, अनुराधा बुरा, कनकलक्ष्मी तुम्मा, आणि श्री गोविंदराज गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश दुडम, हिरालाल माकम; सचिव अनिल गोसकी; सहसचिव अंबादास संगा; खजिनदार अमर कोलप्याक; सहखजिनदार श्रीशैल बंदगी; कार्याध्यक्ष व्यंकटेश दोंता; सहकार्याध्यक्ष उमेश गायकवाड; मिरवणूक प्रमुख उमेश कामूर्ती, श्रीनिवास गुंडला; आरोग्य समिती प्रमोद मार्गम, सुशांत शेंडगे; सांस्कृतिक प्रमुख श्रीनिवास आरकाल; पूजा प्रमुख आदित्य दुडम, रोहित संगा; प्रसिद्धी प्रमुख राजेश मामड्याल, महेश विश्वनाथ; स्पर्धा प्रमुख गोविंद गाजूल, चक्रधर अन्नलदास यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button