इतर

डॉ सुभाष सोमण यांना राज्यस्तरीय आरोग्यदूत पुरस्कार जाहीर!

अकोले प्रतिनिधी

वैद्यकीय पदवीचे उच्च शिक्षण घेऊन ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात तब्बल 56 वर्ष अविरत आरोग्य सेवा करणाऱ्या कोतुळ तालुका अकोले येथील जिल्हाअहिल्यानगर येथील डॉ. सुभाष केशव सोमण यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आरोग्यदूत सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे

अहिल्यानगर येथे गुरुवार दि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व आपल्या कर्तृत्वाने समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

वयाच्या 80 व्या वर्षी ही सेवाभावाने वैद्यकीय सेवा देण्याच्या डॉ सोमण यांच्या उत्तुंग कामगिरीचा आणि समाजहितार्थ असलेल्या धडपडीचा आम्हास सार्थ अभिमान आहे. आपल्या याच संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा यथोचित सन्मान करण्यासाठी, सरपंच सेवा संघाच्या निवड समितीने आपली निवड “राज्यस्तरीय सन्मान २०१६” साठी निवड केली आहे,

शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे , ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे यांच्या शुभहस्ते व यादवराव पावसे पाटील,सरपंच सेवा संघांचे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील, प्रदेशाध्यक्ष रोहीत संजय पवार,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button