नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत पारनेर तालुक्यातील एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या चिमुकल्यांचे घवघवीत यश !

आ.लंके यांनी केले या बाल विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदाचे कौतुक !
पारनेर प्रतिनिधी :
शिरूर येथे झालेल्या 20 व्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत पारनेर तालुक्यातील एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या विदयार्थ्यांनी उस्फुर्तपणे यश मिळविले आहे.इतक्या कमी वयात विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढविण्यात योगदान देणारे या अकॅडमीच्या शिक्षक वृंदांचे व बाल विद्यार्थ्यांचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या .
शिक्षक वृंदांची ही संपूर्ण टीम गेले अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना गणित विषयात आवड निर्माण व्हावी व गणित सोडवण्यासाठी त्यांना गती मिळावी हा उद्देश ठेवून हे नवीन पद्धत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात व विद्यार्थ्यांचाही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे .
या स्पर्धेत पानोली गावचे पाच विद्यार्थी चॅम्पीयन रँक मध्ये तर पारनेरचे दोन विदयार्थी चॅम्पीयन रँक मध्ये आले आहे. शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालयात
७ ऑगस्ट रोजी ही नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धा
घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी संगमनेर, ओझर ,पुणे,श्रीगोंदा, जुन्नर,औरंगाबाद या ठिकाणावरून १२४४विद्यार्थी सहभागी झाले होते .ही स्पर्धा फक्त पाच मिनीटांचीच होती. या पाच मिनीटांच्या स्पर्धेत १५० गुणाकार १८५ भागाकार १७० बेरीज व वजाबाकी तर १६० वर्ग विद्यार्थ्यांनी सोडविले .
विद्यार्थ्याचे गणिताचे स्पीड वाढविणे आणि उत्सुकता वाढवणे हा मानस ठेवून या स्पर्धेत पारनेर तालुक्यातील १२७ विद्यार्थी सहभागी झाले होते . त्यातील ७ विद्यार्थी चॅम्पीयन ८० विद्यार्थी पहिल्या १० क्रमांकावर तर 30 विद्यार्थी बेस्ट रँक मिळवून पारनेर तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा खोवला तालुक्यासाठी घवघवीत यश मिळवणारे व आपल्या कुटुंबासह पंचक्रोशीत कौतुकास्पद वाटणारी ही गोष्ट सर्वांच्या मनाला भावली.या सर्व विदयार्थ्याना अकॅडमीच्या संचालिका सौ.रेश्मा कळमकर व अध्यक्षा सौ.घडेकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .