इतर

पारनेरचे भूमिपुत्र जिल्हाधिकारी गजरे ठरले जागतिक दर्जाचे सुवर्णपदक विजेते  


देशाचे नाव साता समुद्रापार पोहचविणारे श्री गजरे यांचे आमदार लंके यांनी केले कौतुक!


दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :  

        पारनेरचे भूमिपुत्र असणारे व मुंबई सारख्या ठिकाणी जिल्हाधिकारी या पदावर काम करणारे मुंबई स्थित श्री. विकास गजरे यांनी देशाचे नाव साता समुद्रापलीकडे पोहोचवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

.पारनेर येथील व सध्या मुंबई येथे अप्पर  जिल्हाधिकारी म्हनुन कार्यरत असणारे विकास गजरे यांनी दक्षिण आफ्रिकेत 90 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी पुर्ण केली .

पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे संचालक सहदेवशेठ तराळ यांनी त्यांच्या जिद्दीला सलाम करत त्यांचे कौतुक केले करून त्यांना शुभेच्छा दिल्या !         

     कमांडर 2022The Ultimate Human Race जगातील सर्वात जुनी म्हणजे 1921 साली सुरू झालेली ( 100 वे वर्ष ) मॅरेथॉन म्हणजेच  COMRADES MARATHON  रविवार दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी  दक्षिण आफ्रिका येथे पीटरमॅटीसबर्ग ते डरबन या शहरा दरम्यान पार पडली. विविध 70 देशातून साधारण 15,999 स्पर्धकांनी यात भाग घेतला व 11,777 स्पर्धकांनी ती पूर्ण केली. ही 90 किलोमीटर स्पर्धा अतिशय खडतर होती . मात्र स्पर्धेदरम्यान रस्त्यावर खूप चांगला सपोर्ट मिळत होता. 90 किलोमीटरच्या दरम्यान कुठेही एकटेपणा वाटला नाही.माझ्या देशाचे नाव साता समुद्रा पलीकडे माझ्या माध्यमातून अधोरेखित होईल हीच जिद्द ठेवून ही स्पर्धा बारा तासांच्या आत पूर्ण करणाऱ्यालाच मेडल दिले जाते.ही स्पर्धा 11 तास 40 मिनिट 13 सेकंदात पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केली.असे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विकास गजरे यांनी सांगितले

.         किमान 1141पेक्षा जास्त मीटर उंचीचे आणि 1726 मीटर उतार अशा  5 मोठे आणि 7 छोटे मिळून 12 डोंगररांगा मधून जाणारी ही अवघड स्पर्धा ,मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कस पाहणारी स्पर्धा होती ती स्पर्धा वेळेच्या आत पूर्ण करणारे व देशाचा सन्मान असणारा तिरंगा उंचावत विजयी पताका यशवंत खेळाडू म्हणून फडकवणारे विकास गजरे हे पारनेरचे पहिले जागतिक अधिकारी खेळाडू ठरले.एक उच्चपदस्थ अधिकारी असूनही आपल्या जिद्दीच्या बळावर सुवर्णपदक मिळवलेल्या गजरें यांचे पारनेर सह संपूर्ण नगर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button