टाकळी ढोकेश्वर येथील स्वराज्य ॲकॅडमी मध्ये शिक्षक दिन

अपयश आले तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करा : प्रा. खामकर सर
पारनेर/प्रतिनिधी :
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे
.भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी स्वराज्य अकॅडमी ही स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू आहे येथे संचालक सचिन मोरे नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचे विविध उपक्रम घेत असतात. ५ सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त प्रा. शिवाजीराव खामकर सर स्वराज्य अकॅडमीचे संचालक सचिन मोरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य अकॅडमी मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. स्पर्धा परीक्षा व सैनिक भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रा. खामकर सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की सध्या हे स्पर्धेचे युग असून स्पर्धा परीक्षा करताना शिस्त आणि मेहनत अभ्यास चिकाटी महत्त्वाची आहे. तलाठी पोलीस व सैनिक भरती प्रक्रिया स्पर्धा परीक्षे संदर्भात ही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न करत राहावेत मोबाईलचा वापर हा ज्ञानार्जनासाठी करावा त्यांनी यावेळी वैयक्तिक समस्या सोडवण्यावरही मार्गदर्शन केले.यावेळी स्वराज्य अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. दरम्यान स्वराज्य अकॅडमीच्या माध्यमातून आता ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थी घडवले जात आहेत प्रा. सचिन मोरे यासाठी प्रयत्नशील आहेत.