श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहिर करा -घनश्याम शेलार

शेतकऱ्यांना सरसगट ५० हजार रुपये मदत द्या
श्रीगोंदा प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत तातडीने निर्णय घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे
, श्रीगोंदा व नगर तालुक्यामध्ये जुन २०२२ पासुन सलगच्या पडणा-या पावसामुळे सरासरी १६० टक्के पर्यन्तचे पर्जनमान झालेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात व जुन २०२२ पासून सातत्याने पडणा-या पावसामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांचे शेतात उभी असलेली पिके उदा. सोयाबीन, उडीद, मका, कपाशी, सुर्यफुल इ. त्याचबरोबर नव्याने लागवड केलेल्या उसाचे पीक अतिवृष्टीमुळे अक्षरक्षः सडुन गेलेले आहे. याशिवाय वखारीमध्ये साठवण केलेला कांदा हा अतिवृष्टी मुळे सडण्याचे (खराब होण्याचे प्रमाण खुपच मोठे आहे. या सर्व आस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग हा अतिशय हवालदिल व हताश झालेला आहे. दिपावली सारखा महत्वाचा व सर्वांना जिवनामध्ये आनंद निर्माण करणारा सण तोंडावर आलेला असताना मोठ्या विचित्र अशा अस्मानी संकटामध्ये सापडलेला शेतकरी वर्ग अन्य कुठलेच आर्थिक उत्पन्नाचे साधन हाताशी नसल्यामुळे पुर्णपणे मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचलेला आहे. त्यामुळे त्याला सर्वार्थाने आर्थिक मदत करुन दिलासा देण्याचे नैतिक कर्तव्य हे आपल्या सरकारचे आहे. आणि म्हणुनच अत्यंत नम्रपणे मी हे निवेदन आपल्याकडे सादरः करीत आहे. तरी माझ्या या निवेदनाची नोंद घेवुन संपुर्ण शेतकरी वर्गास शासनाने प्रमुख म्हणुन खालील निर्णय घेवून मदतीचा हात देवुन दिलासा देण्याचे काम करावे. ही श्रीगोंदा – नगर तालुक्यातील सर्व शेतकरी भावांच्या वतीने आपणास विनम्र विनंती.
. ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
. सरसकट एकरी रु ५०,०००/- नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत दयावी.
. जुन २०२२ पासुन आज पर्यन्त सर्व विजपंप बंद आहेत व त्यानंतरही पावसाने जर उघडीप दिली तरी आणखी कमीत कमी २ महिने कुठल्या शेतक-यास वीजपंप चालु करावा लागणार नाही याची नोंद घेवुन सर्व शेतक-यांची या कालावधीमधील वीज बिल माफ करावे.
. जुन २०२२ पासुन सततच्या अतिवृष्टीमुळे सर्व रस्त्यांची झालेली अत्यत दुरावस्था त्यांचे दुरुस्तीसाठी विशेष निधींची तरतुद करावी.
अतिवृष्टीमुळे शेतक-यांची निर्माण झालेली आर्थिक कोंडी विचारात घेता सर्व शेतक-यांच्या मुलांची सर्व प्रकारच्या अभ्यास कामाची शालेय फि चालु सन २०२२ – २०२३ या वर्षाकरीता माफ करण्यात यावी.
. अतिवृष्टीमुळे शेतीची कामे ठप्प असल्याने शेतमजुरांना काम नाही, त्यामुळे त्यांचेवर
उपासमारीची वेळ आली आहे. म्हणुन शेतमजुरांना प्रतिदिन रु ५००/- आर्थिक मदत अनुदान दयावे. तरी कृपया वरील सर्व मागण्या त्वरीत मान्य करुन जगाचा पोशिंदा असणा-या बळीराजाला दिलासा दयावा ही अशा मागण्याचे पत्र घनश्याम शेलार यांनी पाठवले आहे.