वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे-अहमदनगर मार्गावर वाघोली शिक्रापूर, रांजणगांव शिरुर 56 किलोमीटरचा महामार्ग

अहमदनगर प्रतिनिधी
ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे.
येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळणार आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी बांधलेला अहमदनगर शहरातील ३ किलोमीटर लांबी असलेल्या चौपदरी उड्डाणपूलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. श्री.गडकरी म्हणाले, मुंबई ते दिल्ली पासून बांधण्यात येणाऱ्या ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’मुळे पुढील काळात अहमदनगर देशाच्या नकाशावर येणार आहे.
सुरत-नाशिक-नगर-सोलापूरमार्ग चेन्नईला जाणाऱ्या नवीन ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ ची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १४१ किलोमीटर आहे.
८० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात जेथे शक्य असेल तेथे लॉजिस्टिक पार्क उभारणे शक्य आहे.
त्यामूळे नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल.
एक्सीस कंट्रोलने हा महामार्ग बांधत आहोत. सध्या याची लांबी १६०० किलोमीटर आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल अंतर आणि प्रदूषणही कमी होईल.
हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यायाने अहमदनगर साठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास श्री.गडकरी यांनी व्यक्त केला.