कासारे येथे बिरोबा महाराजांचा यात्रा उत्सव संपन्न !

सभापती काशिनाथ दाते सरांनी केले आरोग्य शिबिराचे उद्घाटन !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनधी
पारनेर तालुक्यातील कासारे येथे बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सव निमित्त मोफत सर्व रोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच बैल गाड्यांची शर्यतींचे आयोजन केले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले बिरोबा महाराजांच्या आशीर्वादाने आज यात्रा उत्सव निमित्त महात्मा फुले मोफत जन आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याचा लाभ गावातील ग्रामस्थांनी घ्यावा. आयोजित केलेल्या संस्थेचे तसेच डॉक्टरांचे माझ्या वतीने आभार मानतो.
बिरोबा महाराजांच्या आशीर्वादाने मला जिल्हा परिषद मध्ये मिळालेल्या संधीचा या गावच्या देवस्थान विकासासाठी जवळपास १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बिरोबा देवस्थान परिसर अतिशय सुशोभित झाला आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांना अतिशय प्रसन्न वाटत आहे. भविष्यात देखील मी या गावाचा विकास करण्यात कमी पडणार नाही याची ग्वाही देतो. यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत करतो. गाडी मालकांचा उत्साह अतिशय जोरात आहे या उत्साहानिमित्त मला आज आवर्जून उल्लेख करावा वाटतो या गावचे सामाजिक कार्यकर्ते कै. हरिभाऊ दातीर यांच्या स्मरणार्थ देखील घोड्यांच्या स्पर्धा सुभेदार दातीर साहेब यांनी आयोजित केले आहेत हे देखील त्यांच्या स्मृतीस अभिवादन होईल. यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या शर्यती निर्वेघ्नपणे पार पाडाव्यात, कुठलीही दुखापत होऊ नये अशी बिरोबा चरणी प्रार्थना करतो.
दाते सरांनी आमच्या गावाला गेल्या पाच वर्षात भरभरून निधी दिवुन गावचा चेहरा बदलण्याचे काम त्यामुळे झाले. त्यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी आहे. यापुढे त्यांच्या विचारा बरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत:शिवाजी निमसे, सरपंच कासारे
ढोकीचे गाडा मालक कोंडीभाऊ धरम पहिला नंबर बक्षीस रु. ३१ हजार, टाकळी ढोकेश्वरचे गाडा मालक अतुल धुमाळ दुसरा नंबर तर सिद्धेश्वरवाडीचे गाडा मालक कैलास कावरे यांचा तिसरा नंबर आला, तर फायनल सम्राट गाडामालक बबन नाना दातीर व बाळशिराम पायमोडे यांना मिळाला.
यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी, मा. पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी, सरपंच शिवाजी निमसे, माजी चेअरमन संतोष घनवट, गटप्रमुख धनंजय निमसे, वसंत दातीर, भाऊ खरात, माजी सरपंच साहेबरावदादा वाफारे, अजित निमसे, चेअरमन तुळशीराम लगड, संतोष दातीर, मधुकर दातीर, संतोष पानमंद, धोंडीभाऊ दातीर, नारायण पानमंद, डॉ. राजेंद्र दाते, दादाभाऊ कासुटे, शंकर कासुटे, संतोष नरड, गोवर्धन खरात, बापू नरड, प्रदीप साळवे, वैभव नरड, बबन दातीर, गीताराम खरात, भाऊसाहेब नरड, डॉ. संतोष घाणे, डॉ. विनायक दारुंटे, महेश ठाकरे, ऋषिकेश माने, रेश्मा बर्वे, कावेरी घोलप, वैभवी राजदेव, बैलगाडा शर्यत गाडा मालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.