आमदार मोनिकाताई राजळे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगाव, भातकुडगाव,बक्तरपुर, देवटाकळी, मजलेशहर, हिंगणगाव ने यांसह तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गाराच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची ही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. विजेच्या तारा खांबांसह उन्मळून पडले आहे. तर अनेक ठिकाणी मोठ मोठे वृक्ष पडले आहेत. या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी भातकुडगाव भायगाव देवटाकळी या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.
त्यांनी भायगाव येथील डॉ. रघुनाथ आढाव यांच्या शेतातील उन्हाळी बाजरी च्या झालेल्या नुकसानीचे पाहणी केली. त्यानंतर मजलेशहर रोडवरील गणेश निमसे यांच्या शेतातील कांदा पिकाची पाहणी केली. त्यानंतर विविध सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष जनार्धन लांडे यांच्या घरावर रात्री वीज पडली होती. त्याही ठिकाणाची पाहणी करून संवाद साधला. पडझड झालेल्या घरांची व शेतातील पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश आमदार राजळे यांनी दिले आहेत.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर, नायब तहसीलदार रवींद्र सानप, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, भातकुडगाव मंडलाधिकारी आप्पासाहेब शिंदे, युवा नेते संदीप खरड, संतोष आढाव, कैलास लांडे, नानासाहेब दुकळे, माणिक शेकडे,माजी सरपंच हरिभाऊ दुकळे, रामनाथ आढाव, मुसाभाई शेख,शिवाजी लांडे, डॉ. विजय खेडकर, आदिनाथ लांडे, बबन शेळके, भारत खंडागळे, राजेंद्र आरगडे, दत्तु आगळे, महादेव दुकळे, बाळासाहेब लांडे, विठ्ठल साबळे यांच्या आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवगाव तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने तालुक्यातील भायगाव मध्ये सर्वाधिक नुकसान होऊन शेतकऱ्यांची हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे वाया गेला आहे. तालुक्यातील भायगाव मध्ये सर्वाधिक नुकसान होऊन गावातील तीन ठिकाणी विजा पडल्या आहेत. जनार्दन लांडे रवींद्र लोखंडे यांच्या घरावर विज पडून मोठे नुकसान झाले आहे. तर गावातील जगदंबा मंदिराच्या शिखरावरही वीज कोसळून मंदिराचे नुकसान झाले.गारपिटीने अनेक पक्षांना आपले भक्ष्य केले आहे. गारपिटीचा पावसावर बोलताना अनेकांनी पाच दशका पूर्वीहीच्या काळात असा पाऊस झाला नसल्याचे म्हटले आहे.संतोष आढाव
भाजपा शाखा अध्यक्ष भायगाव
नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात तालुक्यातील भायगाव बक्तपुर व देवटाकळी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांचे राहत्या घराचे नुकसान झाल्याने अनेकांनी रात्र जागून काढली आहे. परिसरातील
कांदा, गहू, मका, ऊसासह फळबागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून करून शेतकऱ्यांचे संवाद साधला.शेतकऱ्यांना धीर देऊन लवकरच मदत मिळवून देण्याचे आश्वासन कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिले आहे.संदीप खरड
युवा नेते भाजपा