पारनेर सैनिक बँक संस्थापक सभासदांना पात्र करण्यासाठी नरसाळे यांचा युक्तिवाद.

दत्ता ठुबे
पारनेर- प्रतिनिधी
सैनिक बँकेच्या पारूप यादी हरकतीवर सहाय्यक निबंधक पारनेर कार्यालयात नुकतीच सुनावणी पार पडली.
यात जवळ 28 हरकती आल्या होत्या.यात सर्व सभासदांना मतदानास आधिकार मिळावा ही मुख्य हरकत विनायक गोस्वामी यांनी केली होती.त्यावर बँकेच्या वतीने मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व अँड. माणिकराव औटी यांनी युक्तिवाद केला. युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले की सहकार मंत्र्याने 2018 पोटनियम दुरूस्तीस स्थगिती दिली असली तरी त्यापूर्वी बँकेने 2015 मध्येही पोटनियम दुरुस्त केला आहे त्या नुसार 1 हजार शेअर्स असणाऱ्या सभासदांना अधिकार द्यावा.त्यावर बाळासाहेब नरसाळे,मारुती पोटघन, दादासाहेब रसाळ, विनायक गोस्वामी यांनी 8 हजार सभासदाच्या वतीने बाजू मांडताना युक्तिवाद केला की राज्य शासनाने 2022 क्रियाशील आणि अक्रियाशील सदस्यांबाबतचा नियम रद्द केल्याने 100 रुपये शेअर्स असणाऱ्या सभासदांना अधिकार देण्यात यावा असा युक्तिवाद केला. यावर 19 जूनला जिल्हा उपनिबंधक अहमदनगर निर्णय देणार आहेत.
सभासदांना अपात्र करण्यासाठी संचालक मंडळाची धडपड-बाळासाहेब नरसाळे
आण्णा हजारेंसह ज्या सभासदाच्या भाग रकमेवर बँक उभी राहिली त्याच सभासदांचा हक्क हिरावून घेण्यासाठी संचालक मंडळाने व मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांनी बँकेच्या खर्चाने वकील लावला.बँकेने शेअर्स रक्कम वाढवताना कोणत्याही सभासदांना व्यक्तीगत रित्या नोटीस पाठवून कळीवले नाही. संस्थापक सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव हाणून पाडू व सर्वांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करू.