इतर

डॉ शिरसाठ यांची वैद्यकीय सेवा नेवाशाच्या वैभवात भर–आ. शंकरराव गडाख


सोनई -( विजय खंडागळे )–सोनई येथे ड़ॉ. शिरसाठ यांच्या हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी असणारी अत्याधुनिक सुविधा ही तालुक्यात अभिमानची मान बाब असून नेवासा तालुक्याचे वैभवात भर घालणारी असल्याचे मत माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.
मोफत तपासणी शिबिरा निमित्तने आयोजित कार्यक्रमांत गडाख बोलताना म्हणाले की , रुग्णांना उपचार घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महगाडी वैद्यकीय सेवा घ्यावी लागत होती , आता या ठिकाणी सर्व उपचार, ऑपरेशन, सह आदी सर्व उपचार सर्वाना उपलब्ध झाल्याने गैरसोय टळणार आहे.
डॉ शिरसाठ हॉस्पिटल चे संचालक ड़ॉ. सागर शिरसाठ व ड़ॉ. प्रशांत तुवर ड़ॉ. स्नेहा शिरसाठ, ड़ॉ. रजनी शिरसाठ यांनी आ. गडाख यांचे स्वागत केले.


ड़ॉ. बाबासाहेब शिरसाठ यांनी प्रस्ताविक केले.
मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, ह. भ. प. तुलसी देवी, यांचे मनोगत झाले.
यावेळी मुळा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब मोटे,मुळा बैंकचे अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,साईं आदर्शचे अध्यक्ष शिवआप्पा कपाळे,बैंकचे व्यवस्थापक झीने, ड़ॉ. घावटे, ड़ॉ.रावसाहेब बानकर, प्रा. शिवाजी दरदले, श्री. प्रकाश शेटे,माजी सरपंच राजेद्र बोरुड़े ड़ॉ. संजय चव्हाण,कागोणीचे सरपंच सोमनाथ कराळे, स्वीय सहायक शंकरराव दरदले,मेडिकल असोशियन,सह विविध मान्यवर उपस्थित होते. सूत्रसचलन आप्पासाहेब ढोकणे, आभार ड़ॉ. राजेंद्र घावटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button