इतर

नेप्तीत मोफत आरोग्य तपासणी शिबीरास प्रतिसाद

अहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती येथे
स्नेहालय संचालित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास गरीब गरजूंचा मोठा प्रतिसाद मिळाला

. या शिबिराच्या माध्यमातून गाव व परिसरातील वाड्या -वस्त्यावरील गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, गावातील नागरिकांनी सदरच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला.
केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलच्या माध्यमातून गावकऱ्यांची मोफत सर्वरोग निदान व डोळे तपासणी करण्यात आली असून, गरजूंना मोफत गोळ्या – औषधांचे वाटप करण्यात आले.

सततच्या बदलत्या वातावरणात स्वत:ची आणि कुटुंबियांच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घ्यायची, आहार कशा प्रकारचा असावा, प्राथमिक स्थरावर आजारासंबंधी कशा प्रकारे उपचार करावे याबाबतची माहिती गावकऱ्याना देण्यात आली.


केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल हे स्नेहालय संचालित हॉस्पिटल असून, केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलच्या माध्यमातून, तळागळातील गोरगरीब लोकांना आरोग्याच्या सुविधा अत्यंत अल्पदारात उपलब्ध करून देण्यात येत असून, प्रशस्त असे ५० बेडची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर अत्यंत अल्पदारात उपचार करण्यात येतात.
सदरच्या आरोग्य तपासणी शिबिरास उपसरपंच संजय जपकर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले ,अर्जुन खामकर ,आनंदा जपकर ,हनुमंत साळवे, सखुबाई साळवे ,मंगल फुले, लता होले, केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलच्या डॉ. अर्चना लांडे, अनिकेत धायटे, अनिकेत रानमाळे, अचल बोबडे, गौरी लोणारे, विजय कदम व परिसरातील ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button