इतर

नाशिक डिस्ट्रिक्ट रोटरी फाउंडेशन सेमिनार उत्साहात संपन्न 

 

नाशिक प्रतिनिधी

रोटरी  करीत असलेल्या कार्याची ओळख करून  देऊन त्याद्वारे रोटेरियन्समध्ये नवीन जोश व ऊर्जा निर्माण करण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ नाशिकने  *डिस्ट्रिक्ट रोटरी फाउंडेशन सेमिनार* चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रोटरीचे आंतरराष्ट्रीय  विश्वस्त डॉ.भरत पांड्या हे होते. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर हे होते.

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .डॉ. नेहा मेहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उदयराज पटवर्धन यांनी सेमिनार आयोजित करण्यामागील हेतू विशद केला. मकरंद चिंधडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. भरत पांड्या यांनी रोटरी जगातील सर्व जनतेसाठी करीत असलेल्या कार्याची तसेच विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती देऊन हे कार्य अधिक जोमाने पुढे चालविण्याचे आवाहन केले.

उल्का सिंग यांनी  रोटरी  करीत असलेल्या सामाजिक कार्यासाठी निधी कशा पद्धतीने उभा करावा  यासंबंधी मार्गदर्शन केले .भावेश पटेल, रवी महादेवकर जगदीश फडके आदींनीही विविध विषयांवर सेमिनार मध्ये मार्गदर्शन केले. 

सेमिनार यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर, मोना सामनेरकर  रेखा पटवर्धन व  मिलिंद चिंधडे यांनी काम केले. रेखा पटवर्धन यांनी आभार मानले.  सेमिनार साठी  सुधीर जोशी ,श्री व सौ गोरांतयाल, वृषाली ब्राह्मणकर   व अॅड विद्युल्लता तातेड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button