अकोल्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

अकोले /प्रतिनिधी
अकोले तहसिल कार्यालयात ३७ वा ग्राहक दिन तहसिलदार सतिश थिटे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला
. या वेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अकोले शाखा मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर , कार्याध्यक्ष महेश नवले, रमेश राक्षे, प्रा.डॉ. सुनील शिंदे, माधवराव टिटमे, राम रुद्रे , ज्ञानेश्वर पुंडे, भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब गोंडे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकांच्या अर्जाचे वाचन कार्याध्यक्ष महेश नवले यांनी केले. तालुक्यातील रेशनकार्ड बाबत तहसीलदार सतिश थिटे यांनी एक हजार (१०००) रेशन कार्ड ऑनलाईन केल्याची माहिती देऊन, संजय गांधी योजना त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा अत्यंत वेगाने कामकाज चालू आहे. कोणत्याही अडचणी आल्यास तत्काळ भेटा व लगेच सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले. बालविकास प्रकल्प (अंगणवाडी) पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी अनेकांनी व्यक्त केल्या.
कोल्हार घोटी रस्त्याच्या कामात दर्जा नसल्याचे माधवराव तिटमे यांनी सुनावले. त्याचबरोबर रस्ता खाली व गटारी वर त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यात साचले जाते. ह्या गटारीच्या कामाबाबत अधिकाऱ्यांचे व ठेकेदाराचे पितळ उघड पडल्याचे महेश नवले यांनी सांगितले. अनेक अपघात झाल्याने अनेकजण अपंग झाले आहे यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. महावितरण कंपनीने जीर्ण तारा त्वरित बदलाव्यात . त्याचबरोबर राज्यमहामार्गवरील रस्त्यातील विजेचे पोल त्वरित काढावेत. एस टी बस बाबत अनेक तक्रारी आल्या. अकोले बाजारसमितीत शेतमाल तारण कर्ज सुविधा, गोडाऊन, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करावी. शासनाच्या शेतपिकविमा भरलेला असून तो मंजूरही झाला मात्र यादीमध्ये नाव असे कोट्यवधी रुपये शेतकऱ्याचे विमा कंपन्यांकडे पडून आहे. पिक रक्कम शेतकऱ्यांना व ग्राहकांना विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर अकोले शहरात नगरपंचायतीच्या हद्दीत नगर पंचायतीच्या डाव्या बाजूला गटारी तुंबलेल्या आहे. त्याचबरोबर व शहरात डेंग्यू, चिकनगुनिया , मलेरियाने अनेक नागरिक त्रस्त असताना शहरासह तालुक्यात औषधे फवारणी करण्याची मागणी ज्ञानेश्वर पुंडे यांनी केली आहे. बाजारतळ ते कोर्टापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहेत. सर्व राजकीय व कार्यकर्त्यांचा नेहमीचा वावर असतो. मात्र तो रस्ता त्वरित करावा असे निवेदन प्रा डॉ सुनील शिंदे यांनी केले.

यावेळी तहसिलदार थिटे यांनी सर्व प्रश्न व अर्ज टप्याटप्याने विभाग प्रमुख अधिकाऱ्यांकडून सोडवून घेण्याचे मान्य केले.
यावेळी उज्वला राऊत भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र घायवट, कैलास तळेकर, दत्ता ताजणे, बाळासाहेब नवले, पांडुरंग पथवे, नरेंद्र देशमुख, सुनील देशमुख, रामदास पांडे, प्रमोद मंडलिक, संदीप शेनकर , किरण चौधरी , , लालुपुरी, सुदाम मंडलिक , वसंत बाळसराफ, अनिल कोळपकर , हरिभाऊ अस्वले, मारुती लांघी, शारदा शिंगाडे , मंगल मालुंजकर , ज्ञानेश्वर राउत, अंजली सोमाणी, अनिल भोसले, निता आवारी , नगरसेवक स्वाती शेनकर , भिमाताई रोकडे, अंजली कणाके , मंगेश झोडगे, साहेबराव दातखिळे, विलास आरोटे, व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नायब तहसिलदार बाळासाहेब मुळे, गणेश भानावासे, , संजय गांधी नायब तहसिलदार माळवे, रसिक सातपुते (पुरवठा निरीक्षक) उपस्थित होते.
प्रास्ताविक दत्तात्रय शेनकर, यांनी केले तर माधवराव तीटमे यांनी आभार मानले.