सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही महिलांसाठी प्रेरणादायी: डॉ. संदिप कडलग

अकोले (प्रतिनिधी)-
क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांचे कार्य आजही समस्त (वंचित) महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे डॉ . संदिप कडलग यांनी केले.
अकोले येथील शनी मंदिराच्या प्रांगणात सावित्रीबाई ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय अकोले व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या १७६ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डॉ संदिप कडलग बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे पाटील होते. यावेळी बोलताना म्हणाले की महात्मा ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे १जानेवारी १८४८ रोजी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री मुक्तीची पहाट झाली आता तेथे भव्य असे राष्ट्रीय स्मारक उभे केले जाणार आहे.
तसेच यावेळी खरेदी संघाचे उपाध्यक्ष माधवराव तिटमे बोलताना म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्या दूरदृष्टी पणामुळे आज महिलांना सन्मान अधिकार मिळाले आहेत. फुले दाम्पत्याचे काम देशांमध्ये मोठे असून त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केली.
कार्यक्रमास शाम वाळुंज, गणेश कानवडे, महेश देशमुख, ग्राहकपंचायतचे तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, , मच्छिंद्र मंडलिक , रमेश राक्षे, राम रूद्रे , सुरेश गायकवाड, भाऊसाहेब बाळसराफ, शिवाजी शेटे, भाऊसाहेब गोर्डे, वसंत बाळसराफ, प्रमोद मंडलिक, दत्ता ताजणे, संतु बाळसराफ, दिनेश नाईकवाडी , भाऊसाहेब वाकचौरे, रंजित खैरे, मुकुंद जुन्नरकर, सचिन, सचिन जोशी, सखाहरी पांडे आदि उपस्थित, सूत्रसंचालन मच्छिंद्र मंडलिक व आभार रमेश राक्षे यांनी मानले.